✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.2 ऑक्टोबर) :- भद्रावती तालुक्यात येत असलेल्या चोर गुडगाव वडगाव वायगाव कुरेकर . अशा अन्य गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून एका वाघाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून गेल्या एक-दोन दिवसा आड हा वाघ येतील जनावरांची शिकार नक्कीच करत असल्याने गावातील तसेच गाव परिसरामध्ये शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच काल वायगाव कूरेकर येथील शेतकरी श्री विशाल देवतळे यांची दुधाडू असलेली गाय काल सायंकाळच्या सुमारास वाघाने नरडीचा घोट घेऊन ठार केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे तेव्हा पीडित शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले असून तेव्हा पीडित शेतकऱ्यांना वन विभाग तसेच शासनाकडून आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी अशी मागणी येथील युवा कार्यकर्ते श्री दिनेश विरुटकर यांनी केली आहे शिवाय या वाघाचा बंदोबस्त गेल्या अनेक दिवसापासून करण्यात यावा अशी मागणी या भागातील सर्व गावातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.
परंतु वन विभागाची कर्मचारी याची दखल न घेता येतील शेतकऱ्यांना उडवा उडवी चे उत्तर देऊन होलकावनी लावतात आज पर्यंत छोट्या मोठ्या जनावरांचा बळी जात आहे परंतु उद्या भविष्यामध्ये नागरिकांच्या जीवावर सुद्धा हा वाघ घातक ठरू शकतो तेव्हा शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा जीव घेईल तेव्हाच या वाघाचा बंदोबस्त करण्यात येणार आहे काय असा सवाल या परिसरातील शेतकरी शेतमजूर नागरिक तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते दिनेश विरूटकर करीत आहे .