ठेकेदारी पध्दत बंद करा घुग्घुस व आजुबाजुचा गावातील बेरोजगार पर्मनंट काम द्या….सुरेश मल्हारी पाईकराव चंद्रपूर विधानसभा 

Share News

✒️ संजय तिवारी चंद्रपूर जिल्हा (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.30 सप्टेंबर) :- लॉयडस मेटल अँड एनर्जी प्रा. लि आस्थापननेचे विस्तारीकरण करण्या, संदर्भात घुग्घुस जनसुनावणी घेण्यात आली होती. या जनसुनावणी मध्ये घुग्घुस व आजुबाजुचा खेळे गावांसाठी सोयसुविधा उपलब्ध करून देण्यात यावे. यासाठी सुरेश मल्हारी पाईकराव विधानसभा चंद्रपूर चा वतीने प्रादेशिक अधिकारी व व्यवस्थापक लॉयडस मेटल एनर्जी प्रा लि घुग्घुस यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. 

या कंपनीने कच्चा माल तयार करण्याचे काम गेल्या सन 1992 पासुन लगभग 32 वर्षे झालेली आहेत.

आज हि कंपनी या कच्चा मालाचे रुपांतर पक्क्या मालामध्ये करणार आहेत. म्हणजे कंपनीचे विस्तारीकरण करुन आणखी नवीन प्लांट तयार होणार आहे. 

500 MT चे एक किलन आणि 100 MT चे चार किलन ने आपल्या प्रदूषणाचा आतंक पसरविला आहे. प्रदुषणाचा धुळामध्ये लोह्याचे बारिक कण बाहेर सोडुन लोकांचा आरोग्याशी व जिवाशी खेळ करून आपले स्वतःचे घर भरण्याचे काम हि कंपनी करत आहे. 

मोजका रोजगार देऊन त्यांना कमी पगार देऊन त्यांनी आर्थिक पिळवणूक करत आहे. आणि आता या कंपनीचे विस्तखरिकरण करून आणखी मोठय़ा प्रमाणात प्रदुषणाला आम्ही आमंत्रित करत आहो. 

 घुग्घुस व आजुबाजुचा खेळे गावात म्हणजे आता डब्बल डस्ट येथील नागरिकांना फुकट मिळणार आहे. आधीच येथील नागरिक आपल्या प्रदूषणाचा मार्फत जे लोह्याचे कण बाहेर सोडले जाते. तर आता असे वाटते की संपुर्ण लोहाच बाहेर पडणार आहे. 

आमची या प्रकल्पाला विरोध नाही आहे. परंतु आमचा रास्त मागण्या आहेत. ज्या आपण परिपूर्ण करु शकतात.

 खालील मुद्दे मान्य करा प्रमाणे तरच विस्तारीकरण करा अन्यथा 

1) आपल्या प्रकल्पात वीज निर्मिती केली जाते. तुम्हाला प्रकल्पासाठी जेवढी वीज वापरायची आहे. तेवढी वापर करून उर्वरित वीज घुग्घुस शहराला व आजुबाजुचा खेळे गावाला आपल्या प्रकल्पाचा अंतर्गत वीज मोफत देण्यात यावी. 

2) आपल्या प्रकल्पात कंपनी किंवा आस्थापना आहे. तुमच्या हद्दीत येणारे सर्व गावातील बेरोजगार मुलींना , विधवा महिलांना, निराधार महिलांना, तलाक / घटस्फोटित झालेल्या महिलांना आपल्या कंपनीमध्ये ठेकेदारी पद्धत बंद करून कंपनीमध्ये पर्मनंट काम द्यावे

3) पाणी उपसा करण्यासाठी कंपनीने 70 मिटर लांब तर 50 मिटर रुंद पाणी साठविण्यासाठी टाके /तलाव तयार करण्यात आले आहे. लाखो लिटर रोज पाण्याचा उपसा होणार आहे. त्यामुळे उसेगाव, वढा, धानोरा, आणि समोरील गावांचा पाण्याचा तुटवडा होणार आहे. त्याकरिता घुग्घुस व आपल्या हद्दीत येणारे गावांसाठी पाणी मोफत देण्यात यावे.

4)आपल्या नवीन प्रकल्पासाठी 750 बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे त्या सर्व बेरोजगारांना रोजगार हे ठेकेदारी पद्धत बंद करून आपल्या कारखान्यात स्थायी स्वरूपात म्हणजे पर्मनंट नोकरी देण्यात यावी. मग तो शेतीवर लागणारा असो किंवा तो आपल्या शिक्षण पदवीवर लागणारा असो किंवा तो लेबर असो हे सर्व ठेकेदार मध्ये नाहितर कंपनी मध्ये पर्मनंट लावण्यात यावे. ठेकेदारी पद्धत बंद करावे. 

5) नोकर भरती करते वेळेस घुग्घुस व आजुबाजुचा खेळ्या मध्ये एक भोंगा फिरवून जाहीर पणे आव्हान करण्यात यावे. जणे करुन सर्वांना माहीती मिळेल कि नोकर किंवा लेबर भरती सुरू झाली आहे. 

6) घुग्घुस व आजुबाजुचा गावांमध्ये तुम्हाला जे स्किल्ड कामगार पाहिजे जर ते आमच्या घुग्घुस व आजुबाजुचा गावामध्ये नाही आहे. असे म्हणता कामा नाही. 

घुग्घुस व आजुबाजुचा खेळ्यात जर असे कामगार मिळाले नाहीत. तर आपण आपल्या प्रकल्पाचा माध्यमातून त्या बेरोजगारांना आपल्या कंपनीमध्ये योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून द्या. 

7) घुग्घुस व आजुबाजुचा गावांमध्ये बरेच सिंगल मोटर मालिक आहेत. त्यांच्या कडे गाड्या असुन त्यांना गाडी लावण्यासाठी किंवा त्यांना कामासाठी इकडे तिकडे फिरावे लागते. आणि आमच्या गावात कंपन्या असुन त्यांना काम मिळत नाही.

घुग्घुस येथील सर्व सिंगल मोटर मालक व आपल्या हद्दीत येणारे सर्व खेळ्यातील सिंगल मोटर मालकांना प्रथम काम देण्यात यावे. नंतर बाहेरील ट्रान्सपोर्ट कंपनीला देण्यात यावे. 

8) महाराष्ट्र शासनाचा नियमांनुसार जर 100 कोटी कोणत्याही आस्थापना किंवा प्रकल्पाकरिता लोन म्हणून दिले जाते. तर 100 कोटीचा मागे 250 लोकांना रोजगार मिळतो. या उद्देशाने करोडोने प्रकल्पासाठी शासन लोन मंजुर करते. तर आपण शासनाकडून किती लोन घेतले आहे. हि माहिती लेखी स्वरूपात घुग्घुस व आजुबाजुचा खेड्यामध्ये जाहीर करावी. आणि अर्जदार म्हणजे मला सुद्धा त्याची एक सत्यप्रत देण्यात यावी. 

कारण आपल्या प्रकल्प 700 कोटी रुपयाचा आहे. त्या उद्देशाने आपल्या प्रकल्पात 1500 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 

9) आपण आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून घुग्घूस व आजुबाजुचा गावातील आरोग्यासाठी दवाखाना उभारुण घुग्घुस येथील नागरिकांना योग्य आरोग्य लाभेल असे उपाय योजना करा. 

10) आपण घुग्घुस शहराचा हितासाठी काय करणार. 

आम्ही घुग्घुस वासियांचा वतीने आपण आपले जड वाहतूक हे उसेगाव फाट्या मार्फत घेऊन जावे. जणे करुन प्रदूषणावर, ध्वनी प्रदुषण आणि भविष्यात होणाऱ्या अपघाताला टाळता येईल.

येवढे उपकार आमच्या घुग्घुस वासियांवर करावे. 

11) आपण आपल्या आस्थापना मार्फत शाळा सुरु केली आहेत. तर ती शाळा CSR फंडाचा माध्यमातून केली आहे कि कसे जर CSR फंडाचा माध्यमातून केली आहे. तर आपण आपल्या कारखानीत असणाऱ्या सर्व कामगारांचा मुलांना मोफत शिक्षण द्यावे. 

तसेच घुग्घुस येथील व आजुबाजुचा गोरगरीब गरजु पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊ शकत नाही. असा मुला मुलींना आपल्या शाळेत मोफत शिक्षण द्यावे.

12 आपल्या प्रकल्पामुळे घुग्घुस व आजुबाजुचा खेळे गावातील माझ्या शेतकरी बांधवांचे खुप मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे. शेतामध्ये सोयाबीन व कापूसाचे पिक घेतात. परंतु आपल्या प्रकल्पाचा प्रदूषणामुळे बारिक लोह्याचा कणामुळे हि शेतजमीन सुध्दा नापीक होत असल्याने त्या सर्व शेतकरी बांधवांना आपल्या कंपनीचा हद्दीत येणारे सर्व शेतकऱ्यांना पीकांचे व शेत जमीनचे नुकसान भरपाई देण्यात यावी. 

या सर्व रास्त मागण्या आपण जर पुर्ण करत असाल तर आम्हाला या प्रकल्पाचा विरोध नाही. 

जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही संपूर्ण घुग्घुस शहरातील व आजुबाजुचा खेळे गावातील नागरिकांना घेऊन आपल्या कंपनीचा गेट समोर लोकांच्या आरोग्यासाठी, जिवाचा हितासाठी व त्यांना पर्मनंट रोजगार मिळण्यासाठी, घुग्घुस शहर व आजुबाजुचा गावाला वीज व पाणी मोफत मिळण्यासाठी, शिक्षण मोफत मिळण्यासाठी व वरील सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी तीव्र भुमिका घेऊन नवीन प्रकल्प बंद करण्यासाठी आंदोलन करण्यात येईल. 

या आंदोलनामध्ये जे काही नुकसान व भरपाई चे जिम्मेदार लॉयडस मेटल एंड एनजी प्रा. लि. कंपनी व शासन प्रशासन राहील.

Share News

More From Author

शिक्षणातूनच भोई समाजाची प्रगती : राष्ट्रपती हस्ते पुरस्कृत आशा बावणे (सोनुने)

खंबाटकी घाटात ता. खंडाळा जिल्हा सातारा येथे मोठा अपघात 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *