दैनिक युवक आधारचा प्रथम वर्धापन दिन सोहळा पनवेल येथे संपन्न

✒️सारंग महाजन मुंबई (Mumbai प्रतिनिधी)

मुंबई(दि.27 सप्टेंबर) :- वर्षभरापूर्वी दैनिक युवक आधार वृत्तपत्राने पनवेल शहरांमध्ये दिमाखात पाऊल ठेवून दर्जेदार बातम्या व लेख वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.

         अल्पावधीत लोकप्रिय ठरलेला दैनिक युवक आधार दैनिकाचा प्रथम वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटक नंदकुमार जाधव साहेब अध्यक्ष डॉ. ना .म . जाधव फाउंडेशन पनवेल विशेष उपस्थिती प्रसाद काथे संपादक जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल ,विलास बडे सहसंपादक न्यूज 18 लोकमत, प्रशांत सागवेकर वृत्त निवेदक जय महाराष्ट्र, पोलीस निरीक्षक क्राईम ब्रँच पनवेल ,महेश जी सारणीकर माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती राष्ट्रीय अध्यक्ष, अनिश गाढवे शिवसेना प्रवक्ते, नितीन शिंदे मधु तारा फाउंडेशन पुणे , साक्षी सागवेकर संस्थापिका परिणीता सोशल फाउंडेशन, दैनिक युवक आधारचे संपादक भारती संतोष आमले व संपादक संतोष आमले या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिवछत्रपती महाराज व पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वर्धापन सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले .

     दैनिक युवक आधारचे मुख्य संपादक भारती आमले व संपादक संतोष आमले यांच्या वतीने सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठवाडा विभाग संपादक जगन्नाथ रासवे सर यांनी केले.कार्यक्रमांमध्ये वृत्त निवेदक प्रशांत सागवेकर यांनी प्रसाद काथे व विलास बडे सर यांची घेतलेली मुलाखत खास आकर्षण ठरली. नवोदित पत्रकारांना मुलाखती द्वारे संबोधित करण्यात आले.मुलाखतीमध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये पदार्पण केलेल्या नवीन पत्रकारांनी कोणते नियम पाळावेत याकरिता मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक भान ठेवून समाज हिताची पत्रकारिता करावी असा मोलाचा संदेश प्रसाद काथे यांनी दिला. नियोजित पत्रकारांना मार्गदर्शन करत अनेक विषयावर या मुलाखतीमध्ये चर्चा करण्यात आली . 

                 कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेता ऋषिकेश राजकिरण ऋषिकेश राजकिरण गणेश दळवी विशाल विशाल ताटके, रमेश केदारे माहिती अधिकार व पत्रकार संघ ठाणे जिल्हाध्यक्ष, पत्रकार अतिश केने ,रमेश पाटील, अजित भोईर ,अभय गोंधळी नागपूर, यवतमाळ ,जालना, बुलढाणा ,बीड ,अहमदनगर, नळदुर्ग पैठण , मुंबई व इतर विभागातून दैनिक युवक आधारचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व दैनिक युवा आधारच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास सामाजिक , वैद्यकीय, शैक्षणिक ,वकील, जाहिरात दार प्रतिनिधी इतर माध्यमांचे प्रतिनिधी या सर्वांनी उपस्थित राहून दैनिक युवक आधारला वर्धापनदिना निमित्त शुभेच्छा दिल्या. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायक चारुदत्त घोलप, राज कांबळे, सिद्धार्थ धंदरे सुरेल गीताचा कार्यक्रम सादर केला सर्व उपस्थितांचे आभार संपादक संतोष आमले यांनी मानले.