अवैध व्हिडिओ गेम पार्लर वर आळा घाला

🔸शिव शक्ति सेना यांची मागणी; मुख्यमंत्री ला निवेदन सादर

✒️ संजय तिवारी चंद्रपूर जिल्हा (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.24 सप्टेंबर) :- स्वत:ला समाजसेवक संबोधतात हीच या लोकशाहीची मोठी शोकांतीका आहे. समाजसेवकच जेव्हा अशा सवयी अल्पवयीन मुले, दुकानात काम करणारे कामगार, रिक्षावाले, बांधकाम कामगार, शिलाई कामगार, फेरीवाले, चारचाकीवाले, सुशिक्षित वर्ग, उपगृहात कामगार करणारे चहा, समोसा, असे अनेक संघटित, असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार अशा अवैध व्हिडिओ व्यवसायाच्या आहारी गेलेले आहेत. दिवसभर कमावलेली रोजी व्हिडिओ गेम पार्लर उदडवित आहे.

      सकाळ पासून रात्री पर्यंत गर्दीत जमलेमी दिसत असून हा अवैध व्यवसाय गेल्या काही वर्षांपासून बंद असतांना लोकसभा निवडणुकी नंतर कोणाचा आशिर्वादाने हा अवैध व्यवसाय चालू करण्यात आला आहे. 

        त्यात अवैध व्यवसाय वर त्वरित नियंत्रण आणून अवैध व्हिडिओ गेम पार्लर वर आळा घालवा अशी मागणी शिवसेना प्रणीत शिवशक्ति वाहतुक सेना प्रदेश सरचिटणीस सैयद रब्बानी चिश्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोबत चर्चा करुन निवेदन सादर केले. 

      या निवेदनात अवैध व्हिडिओ व्यवसाय बदलल्या काळानुसार हा व्यवसाय अत्याधुनिक पध्दतीने चालू आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अशा अवैध व्यवसायामुळे समाजकंटक यात वाढ होत आहे. याचा दूरगामी परिणाम सुसभ्य समाजावर होत असुन सामाजिक अभिसरणाचा प्रक्रियेला बाधा निर्माण होत असून अशा व्यवसायात कष्टकरी व कामगारांची अवैध व्हिडिओ गेम पार्लरवर होणारी लयलूट तातडीने थांबवावी.

        या संदर्भात शिवसेना प्रणीत शिव शक्ति वाहतूक सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस सैयद रब्बानी चिश्ती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक निवेदन सादर करून सांगीतले आहे.