चारगाव बु येथे नेत्रतपासणी शिबिर संपन्न

🔸जवळपास चौदाशे लोकांनी घेतला लाभ; चला बदल घडवूया उपक्रम

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.22 सप्टेंबर) : – चला बदल घडवूया या उपक्रमाअंतर्गत आज चंदनखेडा येथे नेत्रतपासणी शिबीर आणि मोफत चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचा चारगाव बु आणि इतर गावातील 1326 गरजूंनी लाभ घेतला. 

समाजकारणात नेहमी अग्रेसर असणारे प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ हे अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्यांच्या नेतृत्वात ‘चला बदल घडवूया’ हा महत्वाकांक्षी उपक्रम सध्या अनेक ठिकाणी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज 22 सप्टेंबरला मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचा चारगाव (बुर्ज), चारगाव (खुर्द), वायगाव(भो), वायगाव(ख), वडधा, दादापूर, अर्जुनी, बेंबळा, राळेगाव, उमरी, बोरगाव, गुंजाळा, साखरा, आबमक्ता, पारडी, गिरोला, धानोली, निमढेला, अकोला, सोनेगाव गावातील 1326 गरजूंनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे उदघाटन दयानंद नन्नावरे यांच्या हस्ते झाले.

अध्यक्षपद डाॅ. चेतन खुटेमाटे यांनी भूषवले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिजीत पावडे, बाळाजी पडवे, नितीन बनसोड, संतोष कुचनकर, नितीन बनसोड, केशव देशमुख, छगन आडकीने, सिद्धार्थ थुल, विजय चौधरी, नरेंद्र गरमडे, श्रावण जिवतोडे, शत्रुघ्न हनवते, शंकर खाडे, विनायक दडमल, इंदुबाई रणदिवे, विद्या खाडे, संदिप चौधरी, दशरथ देहारकर, राजु गोडघाटे, अविनाश डाहुले, अतिश भलमे, विजय गाठले, नथ्युजी तिखट, शांताराम तितरे, मनोहर उज्वलकर, गुलाब घानोडे, शंकर चौधरी, अनुप पावडे हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदिप सोनेकर, संचालन चंद्रशेखर झाडे तर आभार प्रदर्शन अनुप खुटेमाटे यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गुरुदृष्टी नेत्रालयचे पुरुषोत्तम जांभुळकर, मनोहर तितरे, गुलाब एकरे, गुणवंत देहारकर, रोशन मेश्राम, प्रभाकर हनवते, अनिल गरमडे, बंडू क्षिरसागर, कीर्तीवंत नवघरे, संदिप वाढई, शालिक मेश्राम, संभाजी कांबळे, भाऊराव नन्नावरे, मधुकर भलमे, नथ्थुजी रोडे यांनी अथक प्रयत्न केले.