वरोरा-भद्रावती विधानसभेत ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ अभियानाचा धडाका 

🔸जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात बिजोणी येथे शाखेचे उद्घाटन

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.22 सप्टेंबर) : – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ अभियानांतर्गत जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. या अभियानाच्या अंतर्गत वरोरा-भद्रावती विधानसभेतील विविध गावांमध्ये शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात येत आहे. जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेचा विस्तार होत असून, बिजोणी गावात शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

उद्घाटन प्रसंगी मुकेश जिवतोडे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत शिवसेनेच्या शाखांच्या स्थापनेमागील उद्दिष्टे स्पष्ट केली. “गावातील नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि त्यांना एका ठोस व्यासपीठावर आणणे हे या शाखांचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना अधिक प्रभावीपणे तयारी करत असून, या शाखांद्वारे गावागावात शिवसैनिकांचे जाळे विणले जात आहे.

कार्यक्रमाच्या वेळी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमाला प्रतिसाद दिला. स्थानिकांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या आणि त्यावर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन जिवतोडे यांनी दिले. पाणी, रस्ते, आणि अन्य मूलभूत सुविधांच्या बाबतीत ग्रामस्थांच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली.

यावेळी विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, युवासेना विधानसभा समन्वयक निखिल मांडवकर, विभाग प्रमुख, सतीश खामनकर, भाऊराव घागी,सुयोग खामनकर, शाखा प्रमुख मधुकर जोगी, सुभाष रोडे उपसरपंच बिजोनि, स्वप्नील कापसे ग्रा.सदस्य, गजानन खामनकार, तौफिक पठाण, महादेव ठेंगणे, उत्तम कापसे, पिंटू काळे, संभाजी बंदूरकर, गणेश काळे, कैलास ठेंगणे, अमीन बदकी, शंकर खामनकार, सुरज धांडे, उत्तम कापसे, गणेश कापसे, जितेंद्र गेडाम, के.डी. पाटील, देविदास जोगी, हर्षवर्धन खामनकार आदी उपस्थित होते.