होलार समाजाच्या मागण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा इशारा

✒️ सारंग महाजन बुलढाणा (प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.22 सप्टेंबर) :- अखिल भारतीय होलार समाजाच्या वतीने या समाजाच्या विविध मागण्यासाठी सोमवार तारीख 23 सप्टेंबर पासून मुंबई येथील आझाद मैदानावर या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय रणजीत दादा ऐवाळे पाटील हे आमरण उपोषणास बसणार असून त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी सर्व समाज बांधवांनी आझाद मैदानावर हजर राहण्याचे आवाहन मराठवाड्यातील युवा नेते चंद्रशेख केंगार(C.K.अण्णा)यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील होलार समाज वर्षानुवर्ष शासन दरबारी उपेक्षीला गेला आहे या समाजाच्या हिताकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समाजबांधव एकवटले असून या समाजाच्या शैक्षणिक आर्थिक व राजकीय सद्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी अभ्यास आयोग नेमण्यात यावा या समाजाच्या जातीच्या नोंदी चुकीच्या झाल्या आहेत त्या दुरुस्ती करण्यासाठी समिती गठन करण्यात यावी होलार समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे जोपर्यंत विकास महामंडळ स्थापन होत नाही तोपर्यंत संत रोहिदास व चर्मोद्योग महामंडळावर या समाजाचा प्रतिनिधी नेमण्यात यावा.

अशा विविध मागण्यासाठी अमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला असून एक दिवस जातीसाठी होलार समाजाच्या अस्तित्वासाठी समाज बांधवांनी आझाद मैदानावर आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.