आधुनिक भारताचे स्वप्न बघायचे असल्यास खेड्याकडे चला. रवींद्र तिराणिक

🔹ग्रामीण विद्यार्थ्यांनी विज्ञान व कला प्रदर्शनीतून दिला ग्राम उन्नतीचा संदेश

🔸नाना विविध विषयांना साद घालणाऱ्या १५० कवितांच्या सुंदर हस्तलिखित तीन भाषेत असलेल्या काव्यसंग्रहाचे वाद्य वृंदाच्या गजरात थाटात प्रकाशन.

🔹सर्वसामान्य कष्टकरी ,शेतकरी ,कामगार व आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांचा साहित्य लेखन, कला प्रदर्शनी काव्यात सहभाग

✒️ चंद्रपूर (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.3 फेब्रुवारी) :- आधुनिक भारत ‘सुजलाम- सुफलाम “करण्यास शेतकऱ्यांच्या मुलांचे भावी योगदान महत्त्वाचे ठरणार असून ,सरकारने शेतकऱ्यांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने पुढाकार घ्यावा .तालुका ग्रामीण पातळीवर विज्ञान प्रबोधनी व कला प्रबोधिनी उभारावी .त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याकरता फिरते मोबाईल कलाप्रदर्शनी प्रदर्शित करणारी आधुनिक पद्धतीची सोय उपलब्ध करावी .जेणेकरून ग्रामीण भागातील कष्टकरी, मजूर, शेतकरी यांची मुले मागे पडणार नाहीत.

असा विद्यार्थी संवाद विज्ञान व कलाप्रदर्शनीच्या उद्घाटनपर तर मनोगत मांडताना वडकी येथील वंडर्स हायस्कूल अँड ज्युनियर सायन्स ,कॉमर्स ,आर्ट्स कॉलेजमध्ये चार दिवसीय आयोजित स्नेहसंमेलनाप्रसंगी विज्ञान व कलाप्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी कलाअकादमीचे संचालक ,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्क प्रमुख ,जनमंच सदस्य रवींद्र तियाणिक बोलत होते .

राष्ट्रपिता महात्मा गांधीनी आधुनिक भारताचे स्वप्न पाहिले होते .भारत देश विकासात्मक दृष्टीने पुढे जाण्यास खेड्यांची भूमिका महत्त्वाची असून ‘ग्रामउद्योगांची संकल्पना मांडत खेड्याकडे चला” हा संदेश गांधींनी दिला होता .खऱ्या अर्थाने सर्वसामान्य श्रमिक, कामगार ,मजूर ,शेतकऱ्यांच्या मुलासाठी खेड्यापर्यंत विकासगंगा पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नसल्याने महात्मा गांधींच्या स्वप्नातील आधुनिक भारत बघायची स्वप्न कुठेतरी कमी पडतांना दिसत आहे .हा संवाद याप्रसंगी व्यक्त केला.

भारतात महाराष्ट्रातील विदर्भात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या ग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख असलेल्या राळेगाव तालुक्यातील ग्रामीण स्थळ वडकी येथील स्मॉल वंडर्स हायस्कूल अँड जूनियर विज्ञान कॉमर्स आर्ट कॉलेज मधील शिक्षणाचे नवनवीन अविष्कारांचे प्रयोग साकारित कलाविषयक बाबींना लक्ष केंद्रित त्यातून शैक्षणिक उत्क्रांतीचे धडे घेत असलेल्या ग्रामीण विभागातील सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या मुलांनी एकत्रित येऊन पर्यावरण प्रदूषण ,परिणामी पर्यावरणाचा ऱ्हास आणि वनसंवर्धन ,ऊर्जा निर्मिती, मानवी आरोग्यावर लाभदायी ऑक्सिजन निर्मिती ,सायकल सिस्टीम ,स्वयंपूर्ण विद्युत निर्मिती, ग्रामीण मिल संकल्पना, स्वयंचलित ग्रामोद्योग, रेन वॉटर हार्वेस्टिंग संकल्पना, अंतराळातील ग्रह, रोपट्यांची बीज प्रक्रिया, पौराणिक, ऐतिहासिक किल्ले व त्यांचे जतन, पवनचक्की, विज्ञान व पर्यावरण ग्रामीण विकास यावर अनेक मॉडेल विज्ञान प्रदर्शनी मध्ये साकारले होते. 

कलाप्रदर्शनी मध्ये विविध विषयांना हात घालीत विद्यार्थ्यांनी आपल्या कलेची चुणूक दाखवीत रेखाटन ,पोर्ट्रेट ,लँडस्केप ,डिझाईन ,मंडेला, ताजमहल मॉडेल ,क्ले वर्क ,हस्तकला निर्मिती स्टोन, सुंदर हस्ताक्षर स्लोगन पोस्टर ,आधी विविध कलेचा कलाकुसर टाकाऊ पासून टिकाऊ निर्मिती चा समावेश कला प्रदर्शनी मध्ये दिसून आला. शिक्षकांची कल्पकता व विद्यार्थ्यांची कलात्मकता अविष्कार विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा मेळ सदर प्रदर्शनी मधून साकारण्यात आला होता.

विशेषतः ही मुले सर्वसामान्य वर्गातील शेतकऱ्यांची त्यातील काहीचे आई-वडिलांचे छत्र हरवलेली होती.वडकी येथील स्मॉल वंडर्स हायस्कूल अँड जूनियर सायन्स, कॉमर्स ,आर्ट्स कॉलेज द्वारा आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन २६ते २७ जानेवारी याकालावधीत सांस्कृतिक ,क्रीडा,नृत्या बरोबर फॅशन शो ,फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या.

 दिनांक १ते ४ फरवरी पर्यंत हस्त कला व चित्रकला व विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.कला प्रदर्शनीचे उद्घाटन कलाअकादमीचे संचालक अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख जनमंच सदस्य रवींद्र तिराणिक यांनी केले .

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध विषयावर आधारित मर्म भेद असणाऱ्या १५० विद्यार्थ्यांच्या काव्यातून तयार झालेल्या सुंदर हस्ताक्षरातील नाविन्यपूर्ण कवितांचा (इंग्रजी -मराठी -हिंदी) या त्रीभाषिक हस्तलिखित काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रवींद्र तिराणिक हस्ते झाला .

प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक माधवराव कडू, सेवानिवृत्त शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष गंभीरराव भोयर, चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख शशिकांत मोकाशे ,यवतमाळ जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा काकडे, माजी सरपंच नम्रता काकडे, वंडर हायस्कूलअँड जूनियर सायन्स, कॉमर्स, आर्ट कॉलेजच्या प्राचार्य मंजुषा सागर, शेख हुसेन, शंकर मालखेडे, नितीन गवळी, शनी हनीफ शेख आदींची उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे सूत्र संचालन अतुल भेदुरकर ,आभार प्रदर्शन उप मुख्याध्यापक अहमद शेख यांनी केले. विज्ञान व प्रदर्शनी मध्ये टॉप मॉडेल म्हणून ठरलेल्या हर्षदीप ढाले, ओम येपारी, ओम केराम, क्षितिज शेट्टे, रोशनी कुडवे, खुशी ताजने, राधा फुटाणे, दीक्षा फरकाडे ,अनिकेत इंगळे ,दिशांत फाले ,विधीता मांडवकर, निर्मिती खंडाळकर, देवांश गवळी, पार्थ घुगरे, मयूर ताठे, पुनीत भंडारी, यशवीर व्यास, स्वरा केराम, यशदा शेट्टै , ममता सहानी, सायली वानखेडे, नीरज राऊत, तन्मय उंबरकर, भावेश भंडारी, क्रिश ताजने, आयुष सरोदे आदी गुणवत्ता प्रथम श्रेणीत सहभागी विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.