🔸पोलिस प्रशासन व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे किशोर टोंगे यांनी मानले आभार
✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.19 सप्टेंबर):-
आपल्या सर्वांचा लोकप्रिय गणेशोत्सव पार पडला असून काल लाडक्या बाप्पाला वरोराकरांनी मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या गजरात व् डिजेच्या तालावर वाजत-गाजत नाचत पुढच्या वर्षी लवकर या म्हणत रात्री बारा पर्यन्त निरोप दिला.
यावेळी या विसर्जन मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते, गावा गावातून व शहरातून मोठ्या प्रमाणात गणेशभक्त सहभागी झाले होते. ही विसर्जन मिरवणूक शांततेत व सौहर्दाच्या वातावरणात पार पडली यासाठी भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व किशोर टोंगे यांनी मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व पोलिस प्रशासनचे आभार मानले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की आम्ही पोलिस प्रशासनाला गणेश विसर्जनात रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यासह गणेश विसर्जन करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती त्याला पोलिसांनी सहकार्य केले याबद्दल पोलिस प्रशासनाचे देखील आभार मानतो असही ते म्हणाले.
वरोरा येथील गणेश विसर्जन मिरवणूक वाद्य सह रात्री बारा पर्यंत उत्साहात व शांततेत पार पडली त्याबद्दल मा.नयोमी साटम उपविभागीय पोलीस अधिकारी मा. अजिंक्य तांबळे ठाणेदार पोलीस स्टेटस वरोरा यांचा शाल व प्रतिमा देऊन भारतीय जनता पार्टी वरोरा च्या वतीने सत्कार केला त्यासोबत सर्व पोलीस प्रशासन, पोलीस मित्र, शांतता कमेटी व गणेश मंडळाचे व भक्ताचे मनःपूर्वक धन्यवाद