साहेब माझ्या पत्नीला नका, माझ्या गावातील तलावाचे काम करून द्या 

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.19 सप्टेंबर) :- तालुक्यातील पुरातन विभागाने प्रसिद्ध असलेले भटाळा हे गाव आहे.

 या गावांमध्ये सरकारी मामा तलाव असून ते तलाव 99 एकर जागेवर असून त्या मधील अतिक्रमण केलेले आहे याबाबत शेतकरी यांनी शासनाकडे तक्रारी करून काहीच झाले नाही .

तर या तलावाचा मुख्य कालवा तीन किलोमीटर असून दरवर्षी तो सात आठ ठिकाणवून फुटतो मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे दरवर्षी या तलावाचे काम शेतकरी श्रमदान मधून करत आहे .

तसेच या पाण्याखाली येणारी धान क्षेत्र 300हेक्टर असून शेतकरी यांनी जर श्रमदान मधून काम नाही केले तर शेती साठी लावलेला लाखो रुपये खर्च वाया जाईल म्हणून ते स्वतः काम करीत आहे .

मात्र याबाबत सरकार कडे तक्रारी केल्या तर पैसे नाही म्हणून तर या तलावापासून सरकारला काहीच फायदा नाही म्हणून संबंधित तलावाकडे प्रशासन लक्ष देत नाही म्हणून शेतकरी यांनी माझ्या पत्नीला लाडकी बहीण योजना नका द्या पण माझे जीवन ज्या शेतीवर आहे तिला पाणी पोहचले पाहिजे म्हणून तलाव दुरुस्ती साठी निधी मंजूर करून द्यावा अन्यथा आम्ही त्याच तलाव मध्ये जलसंमाधी आंदोलन करू अशा इशारा आपत्ती ग्रस्त शेतकरी तसेच शेतकरी नेते श्री किशोर डुकरे यांनी सरकारला दिला आहे.