चितळाची शिकार प्रकरणी मुद्देमालासह एक आरोपीला अटक दोन फरार

🔹राजुरा वन विभागाची कारवाई

✒️चंद्रपूर (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.2 फेब्रुवारी):- मध्य चांदा वनविभागाच्या राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या टेभुरवाही वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक 167 मध्ये तार फासे लावून चितळाची शिकार करून माणसाची विल्हेवाट असताना वनकर्मचारऱ्यांनी धाड टाकून तुलना येथील वडगू काशिनाथ टेकाम या आरोपीस मुद्देमालसह ताब्यात घेतले तर इतर दोन आरोपी फरार झाले आहेत.

 

टेभुरवाही नियतवनक्षेत्रातील कक्ष क्रमांक 167 मध्ये तार फासे लावून चितळाची शिकार केली नंतर त्याचे मांसाचे तुकडे करून विल्हेवाट करीत असल्याची माहिती वनकर्मचार्याना मिळाली माहिती मिळताच घटनास्थळी धाड टाकले असता तुलाना गावातील वडगू टेकाम यास मुद्देमालासह ताब्यात घेतले परंतु यात सहभागी असलेले इतर दोन आरोपी फरार झाले ताब्यात घेतलेल्या आरोपी कडून मोक्यावरून 8 किलो चितळाचे मांस, चामडे,21 नग तार फासे जप्त करण्यात आले याप्रकरणी आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून वडगू टेकाम यास अटक करून फरार आरोपीचा तपास सुरू आहे.

   ही कारवाई उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू,सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांचे नेतृत्वात क्षेत्रसहायक संतोष संगमवार,प्रकाश मत्ते, वनरक्षक अर्जुन पोले,वर्षा वाघ,सायस हाके,एस डी सुरवसे,सुनील गजलवार,मीरा राठोड,डी एम चंदेल,सुनील मेश्राम यांनी केली पुढील तपास सुरू आहे.