महिलांसाठी १५ सप्टेंबरला निःशुल्क नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

🔹ना. श्री. मुनगंटीवार यांनी बल्लारपूर येथील कार्यक्रमात ‘दिला शब्द केला पूर्ण’

🔸शिबिरांत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.15 सप्टेंबर) : – वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने व कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम (वर्धा) यांच्या वतीने बल्लारपूर येथील महिलांसाठी निःशुल्क नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन उद्या,रविवार दि. १५ सप्टेंबर २०२४ करण्यात आले आहे. बल्लारपूर येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत कार्यक्रमात महिलांसाठी नि:शुल्क नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्याचा शब्द ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. या आयोजनाच्या निमित्ताने त्यांनी आपला शब्द पूर्ण केला आहे.

नागरिकांना बल्लारपूर येथील जुन्या बसस्टँड जवळील महात्मा गांधी शाळेत सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत या शिबिराचा लाभ घेता येईल. बल्लारपूर शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा या शिबिराचे संयोजक आहेत. या नेत्रचिकीत्सा केंद्राच्या माध्यमातुन गावागावातुन नेत्ररुग्ण तपासणी अंती ज्या-ज्या महिला चष्म्यांसाठी पात्र ठरतील त्यांना मोफत चष्मे वितरीत करण्यात येईल. तसेच, जे मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरतील त्यांची मोफत मोतिबिंदू व डोळ्यात जाळा असेल त्यांची कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम (वर्धा) येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल.

या शिबीरातील वैशिष्ट्ये म्हणजे रक्तदाब (बि. पी.), शुगर तपासणीसह महिलांचे आयुष्यमान भारत कार्ड देखील तयार करण्यात येईल. यापूर्वीही ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात सुमारे ४० हजारावर नागरिकांना मोर्फत चष्मे वितरीत करण्यात आले असून १६ हजाराच्यावर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. विकासकामांसह सामाजिक जाणीव जपत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, अशी विनंती संयोजक बल्लारपूर शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यांनी केली आहे.