आजाराने ग्रस्त पत्नीची धारदार चाकूने केली पती ने हत्या

✒️संजय तिवारी चंद्रपूर जिल्हा (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.13 सप्टेंबर) :- 

             कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला चाकूने ने निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोठारी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुळेसावली येथे घडली.

वंदना धनपाल रामटेके (60) रा. कुडेसावली असे मृत महिलेचे नाव आहे याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती धनपाल माधव रामटेके (वय 67) याच्यावर भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 

        धनपाल याचे पत्नी वंदना सोबत वारंवार कौटुंबिक वादातून दोघांचे रोज वाद होत होते. वंदना ला दुर्धर आजार ग्रस्त असल्याची माहिती पुढे आली आहे. गुरुवारी ला सकाळी सुद्धा त्या दोघांमध्ये वाद झाला वादाचे स्वरुप हाणामारीत झाला.

      या दरम्यान वंदना घरील कामे करण्याचा फायदा घेत धनराज ने धारदार चाकुने सपा-सप वार करीत चाकु पाठीत भोसकला. ती यावेळी तिने मागे बघीतले असता पुन्हा तो चाकु पोटात भोसकला. त्यानंतर तिने स्वताला वाचविण्याचा प्रयत्नात हात समोर केला असता हातावरही वार केला. रक्ताच्या थारोळ्यात वंदना कोसळली आरोपीने रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या पत्नीला रस्त्यावर नेले असता काही गावातील नागरिक तिला वाचवायला पुढे आले पती धनराज गावकर्‍यांना मारण्याची धमकी देत म्हणाला जर तिला वाचवायला पुढे आला तर त्याला सुद्धा ठार करू अशी धमकी धनपाल ने गावकऱ्यांना दिली, त्यामुळे कुणीही पुढे यायची हिम्मत केली नाही.

         यावेळी काही का होईना गावकऱ्यांनी एकमत होवुन वंदना चा जिव वाचविण्यासाठी कोठारी येथील रुग्णालयात नेले. मात्र तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने बल्लारशा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच कोठारी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश खरसान आपल्या घटनास्थळावर दाखल झाले. नेमके या घटनेचे कारण स्पष्ट झाले नाही. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतकाचा पती धनपाल रामटेके याला अटक केली. पुढील तपास कोठारी पोलीस करीत आहे.