✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि. 12 सप्टेंबर) :- शेतकऱ्यांनी काढलेल्या शेत पिकाच्या विम्याची रक्कम गेल्या काही दोन तीन दिवसात मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी सोशल मीडिया वर जाहीर केल्याने अनेक शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला परंतु गेले काही दिवस लोटून देखील सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा रक्कम अजून देखील जमा झाली नाही म्हणजेच येथील शेतकऱ्यांना भूलथापा देऊन त्यांना विश्वास देत असून त्यांची जणू थट्टा करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अशा अनेक भूलताफा देऊन शेतकऱ्यांना अंधारात का ठेवतात त्यांचा विश्वासघात का करतात शेतकऱ्यांना आपल्या शेतीपीकाचा विमाची रक्कम मिळणार असल्याने अनेक शेतकरी आपल्या बँकेच्या चकरा मारतात व व बँक खात्यामध्ये झिरो रक्कम असल्याने निराशा पोटी दुःखी चेहरा घेऊन वापसी येतात करिता अहो साहेब किमान शेतकऱ्याच्या भावनाची कदर जाणीव ठेवून त्यांना भूलथापा न देता त्यांची थट्टा थांबवा. अशी मागणी यावेळी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते तसेच शेतकरी पुत्र श्री राजू भाऊ चिकटे यांनी केली आहे. साविस्तर असे की.
कृषिमंत्री आणि अर्थमंत्री यांचेकडून शेतकऱ्यांची फसवणूक पिकविमा निधी वाटपसाठी निधी वेळेवर उपलब्ध नाही “अधिकाऱ्यांकडून तारीख पे तारीख”
सन २०२३ खरीब पिकविमा निधी वाटपाकरिता शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसत आहे सन २०२३ मधील खरिब पिकविमा निधी आत्ता पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला नाही , शेतकऱ्यांना शेतमजुरांना,कापणी, खूरपण करण्याकरिता वेळोवेळी पैस्याची गरज पडते , शेतकरी पिकविम्याच्या आशेवर शेतमजुरांची पैसे देणार या भरवश्यावर काम करुन घेत आहे , परंतु मागच्या वर्षी जो पिकविमा मंजूर झाला त्याचे पैसे अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले नसल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे .
परंतु मागून काढलेली लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर देऊन लाडक्या बहिणीला खूश आणि तिच्या शेतकरी दादल्याला रुसवा या सरकार न दिला आहे गरजेच्या वेळी सरकार जर शेतकऱ्यांच्या कमी पडत नसेल तर असल्या सरकारचा काय फायदा असल्या त्रिशंकू सरकारला येत्या निवडणुकीत आम्ही शेतकरी त्यांची जागा दाखवून देऊ .असे ही राजू भाऊ चिकटे शेतकरी पुत्र यांनी म्हटले आहे.