कावडी येथे शिवसेना (उबाठा) गटाची शाखा स्थापन:जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या हस्ते उद्घाटन

🔹गाव तिथे शाखा अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

✒️भद्रावती (Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

भद्रावती (दि.11 सप्टेंबर) :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” या अभियानांतर्गत तालुक्यातील कावडी येथे नव्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. जिल्हाप्रमुख तथा वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या हस्ते शाखेच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले. गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना पक्षाच्या योगदानावर भर देण्यात आला.

मुकेश जिवतोडे यांनी या प्रसंगी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्यांवर चर्चा केली आणि गावाच्या प्रगतीसाठी पक्षाचे सक्रिय प्रयत्न सुरूच राहतील, असे आश्वासन दिले. त्यांनी स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देऊन, शेतकरी, विद्यार्थी, तरुण आणि महिला यांच्या कल्याणासाठी शाखेच्या माध्यमातून काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

गावकऱ्यांनी यावेळी विविध विषयांवर मोकळेपणाने आपली मते मांडली, ज्यात गावातील मूलभूत सुविधांच्या बाबतीत सूचना देण्यात आल्या. मुकेश जिवतोडे यांनी तातडीने यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आणि येणाऱ्या काळात अधिक चांगले बदल घडविण्यासाठी शिवसेनेची बांधिलकी पुन्हा एकदा ठामपणे मांडली.

शाखेच्या उद्घाटनामुळे गावात नवीन उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शिवसेना पक्षाने कावडी येथे गावाच्या उन्नतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

या कार्यक्रमात उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड,युवासेना विधानसभा समन्वयक निखिल मांडवकर,कामगार सेना सचिव धनराज कुमरे,शाखा प्रमुख गणेश पोटे,उपशाखा प्रमुख विकास बावणे सचिव मयूर सिडाम,लकी अन्सारी,निलेश पोटे , निकेश निखाडे ,गौरव पारशिवे नागलोन तंटामुक्ती अध्यक्ष चेतन ढवस कुचना शाखाप्रमुख टपू कुळसंगे,अरुण किन्नर,रुपेश पोटे,नंदकिशोर पारखी, गणेश तोडासे, संदीप मुसळे , देवराव तोडासे, पांडुरंग सोनुले, अशोक ठाकरे , नथू देरकर , पिंटू खिरटकर ,शुभम दाते, राजू सिडाम, गणेश सातघरे , राहुल सातघरे ,उमेश डाखरे ,शांमभाऊ टोंगे , इशांत पोटे , सुनिल पोटे , अर्जुन पोटे , प्रकाश बावणे ,पूजराम निखाडे , रवि बावणे , अनिल पोटे , निलेश पोटे , प्रमोद सोनुले ,अक्षय गाफाडे , जगन बावणे , अनिल माताडे , मंगेश बावणे , आनंद डोंगे , निशांत चौहान व आदी उपस्थित होते.