🔸शेगाव पोलिसांचा चोख बंदोबस्त
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.6 सप्टेंबर) :- स्थानिक चारगाव बू येथे आज अमोल भरत शास्त्रकर शिपाई ग्रामपंचायत चारगाव बु. यांची शिपाई या पदासाठी निवड महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 61 व मुंबई ग्रामपंचायत नोकराबाबत नियम 1960 च्या सेवा व शर्तीच्या अधीन राहून करण्यात आलेली होती. येथील शिपाई अमोल शास्त्रकार यांनी सन 2023 /24 या आर्थिक वर्षात नमुना 9 ग्रहकर व विशेष पाणीपट्टी कर मागणीनुसार खातेदाराकडून वसूल केली.
परंतु ग्रामपंचायत कार्यालयातील नमुना 10 पावती बुक मधील कार्बन कॉपी मध्ये कमी रक्कम नोंदवून मोठ्या प्रमाणात रकमेची अपरातफर केलेली असल्याचे उघडकीस आले. श्री रवी बाबाराव भलमे यांनी सन 2023 /24 नमुना 9 नुसार गृहकर थकीत मागणी रुपये 2811 रुपये नोंद आहे पावती बुक क्रमांक 1 मधील पावती क्रमांक 30 दिनांक 30. 11.20 23 कार्बन कॉपीमध्ये रुपये 400 रुपये ती नोंद केलेली आहे खातेदाराने 1400 रुपये भरले असताना 400 रुपये ग्रामपंचायतचे नमुना 5 क मध्ये नोंदवून रुपये 1000 रुपयाची आर्थिक अफरातपर केली असल्याचे दिसून आले.
ज्या अर्थी श्री अमोल भरत शास्त्रकर शिपाई यांनी वरील प्रमाणे कर्तव्य पलयनात गैर व्यवहार केले असल्याचे उधडकिस येथे गावात खळबळ उडाली तेव्हा अनेकांनी आपली भरलेले पावती व कार्बन कॉपी तपासणी केली असता अनेकांच्या रकमेत अफरा तफर असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा आज दीं 6 सप्टेंबर रोज शुक्रवार ला ग्रामसभा घेण्यात आली होती.
सदर या मुख्य विषय म्हणजे भ्रष्टाचार पैशाची अफरातफर व गैरव्यवहार करणाऱ्या शिपायाला कायमस्वरूपी निलंबित करून त्यांच्या कडून व्यजनिशी रम्मक वसूल करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी अट यावेळी गावकऱ्यांनी धरली होती . सदर ही ग्रामसभा येथील सरपंच श्री योगीराज वायदुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. सदर या ग्राम सभेत कासलही गोंधळ किव्हा विपरीत परिणाम होनार नाही या करिता शेगाव बू येथील पोलीस स्टेशन चे psi श्री महादेव सूरजुसे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ..
काही गावकऱ्यांच्या मतानुसार सन 2023 मध्ये असलेले ग्राम विकास अधिकारी , सरपंच , तसेच ग्राम पंचायत चे सर्व पदाधिकारी सदस्य गण यांची देखील सखील चौकशी करून दोशिवर कारवाई करण्यात यावी जेणे करून यात ग्राम पंचायत च काही हातभार आहे काय असा सवाल नागरीक करीत होते . तेव्हां सदर ही कारवाई येत्या दोन दिवसांत करण्यात यावी. व नवीन शिपाई पदाची निवड करण्यात यावी. अशी मागणी गावकरी करू लागले आहेत. यावेळी येथील सरपंच श्री योगीराज वायदुळे , ग्रामसेवक श्री लांडे साहेब तसेच सर्व ग्राम पंचायत चे सदस्य गण व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.