🔹खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदन सादर
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.1 सप्टेंबर) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या भद्रावती तालुक्यात येत असलेल्या कोकेवाडा तुकूम. या गावात तसेच गाव परिसरामध्ये नागरिकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या अनेक समस्या प्रलंबित असून येथील जनता अनेक समस्याने ग्रासलेली आहेत करिता गावातील तसेच परिसरातील अनेक समस्या निकाली काढण्यात याव्या याकरिता येथील युवा कार्यकर्ते श्री प्रतीक अभय खिरटकर यांच्या सह गावातील नागरिकांनी महोदया श्रीमती प्रतिभाताई धानोरकर खासदार यांना निवेदन सादर करून समस्यांचे निवारण करण्यासाठी मागणी केली.
विशेष म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकेवाडा तुकुम ते चंदई नाला नहर पर्यंत शेतकऱ्यांच्या सोई करिता पांदन रस्त्याची निर्मिती तात्काळ करण्यात यावी . येथील नागरिक सर्वाधिक शेतकरी असून पावसाळ्यामध्ये आपल्या शेतामध्ये जाण्याकरिता रस्त्याची मुख्य सोय नसल्याने शेतकऱ्यांना खते बी बियाणे शेती मशागत साहित्य व अन्य शेती कामकाजाकरिता जाण्यासाठी नाहक मोठा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या तसेच शेतमजुरांच्या सोयीकरिता पांदन रस्त्याची निर्मिती तात्काळ करण्यात यावी अशी मागणी केली.
याच सोबत कोकेवाडा तू. ते धानोली ते दादापुर ते शेगाव बूज. हा मार्ग गेल्या अनेक वर्षापासून जनतेच्या सोई करिता निर्माण करण्यात आला होता या रस्ता निर्मिती साठी कोकेवाडा धानोली तसेच दादापुर व अन्य गावातील शेतकऱ्यांची शेत जमीन हस्तगत करून रस्त्याची निर्मिती केली.
परंतु गेले विस वर्ष लोटून देखील या पीडित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा मोबदला अजून देखील मिळालेला नाही करिता या प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडित व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळवून देण्यात यावा या करिता खासदार महोदय प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदन सादर करून गावकऱ्यांनी आपल्या मागण्या केल्या आहेत यावर खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी या गंभीर समस्या कडे जातीने लक्ष घालून तुमच्या मागण्या निकाली काढले अशी ग्वाही दिली.
यावेळी गावचे युवा कार्यकर्ते प्रतीक अभय खिरटकर , गणेश बलकी , मंगेश नागोसे, रमाकांत सावसाकडे , हनुमान वासे , अमोल आमने , स्वप्नील धारणे, गणेश माथनकर , प्रदीप वागदरकर, वसंता वावरे इत्यादी युवक हजर होते.