शेगाव बूज, खांबाडा, टेमुर्डा, चारगाव परिसरातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित

🔹शासनाची आश्वासने फोल पोळ्याच्या सणाला शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा रक्कम अदा करा..राजू चिकटे यांची मागणी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.30 ऑगस्ट) :- स्थानिक शेगाव तसेच वरोरा तालुक्यातील शेगाव बु. खांबाळा , टेमुर्डा , चारगाव अशा अनेक गावातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या शेत मालाचा पिकाचा विमा उतरवला असून या विमा ची रक्कम नुकसान भरपाई म्हणून शासन काही दिवसातच पीडित नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा ची रक्कम या महिन्याच्या ऑगस्ट 31 पर्यंत सर्व खातेदारांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची ग्वाही यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी दिली होती याच आशेवर अनेक शेतकरी आज पर्यंत एका दिव्यासमान वाट पाहत होते. परंतु पालकमंत्री महोदय यांच्या बोलण्याच्या सांगण्यावरून आश्वासावरून शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारचा अजूनही लाभ मिळाला नसल्याने या परिसरातील शेतकरी आजही चिंतेत आहे .

शिवाय ग्रामीण भागातील पोळा हा सण शेतकऱ्यांचा दिवाळी दसऱ्यापेक्षाही अधिक महत्त्वाचा असतो या सणासुदीला अनेक शेतकरी शेतमजूर कवडीमोल करून कर्जबाजारी होऊन तसेच स्वतःच्या पत्नीच्या अंगावरील असलेले दाग दागिने गहाण करून शेतकरी तसेच शेत मजूर पोळा हा सण मोठ्या उत्साहाने तीन दिवस साजरा करत असतो परंतु या परिसरातील शेतकरी हा आपल्या शेत पिकाचा विमा शेतीची नुकसान भरपाई पोळ्याच्या आधीच मिळेल या आशेवर होता . परंतु आज येथील शेतकऱ्यांची आशा भंग झाल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. शिवाय पोळा हा सण साजरा कसा करायचा यावर त्याचे अधिक लक्ष लागले आहे तेव्हा ग्रामीण भागातील तसेच शेतकरी बांधवांचा पोळा हा सण मुख्य महत्वाचा लक्षात घेता पोळा या सणाच्या शुभ मुहूर्तावर दोन दिवसात त्यांच्या खात्यात विमा रक्कम अदा करण्यात यावी . जेणेकरून शेतकऱ्यांचा पोळा हा सण साजरा व्हायला पाहिजे शेतकरी जगला तरच शेतमजूर व अन्य कामगार जगेन याची शासनाने तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी लक्षात घेतले पाहिजे.

जर शेतकऱ्यांचा पोळा हा सण अंधारमय होत असेल तर व शेतकऱ्यांना पोळा या सणाला त्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास संतापाची लाट घेत शेतकऱ्यांसमक्ष तसेच शेतमजूर यांच्यासह शासनाच्या दालनात आंदोलन बंड पुकारण्यात येईल असे यावेळी शेतकरी पुत्र तसेच काँग्रेसचे युवा कार्यकर्ते तसेच शेतकरी शेतमजूर यांचा मुख्य कना असलेले व भावी आमदार संबोधले युवा नेते श्री राजूभाऊ चिकटे यांनी केले आहे.