मनोहर हनवते तिसऱ्यांदा तं.मु.स.अध्यक्षपदी अविरोध

Share News

🔹शिवसेना (उ .बा.ठा) गटाचे चंदनखेडा शाखा विभाग प्रमुख मनोहर हनवते

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.30 ऑगस्ट) :- 

मागील दोन वर्षात केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती म्हणून जनतेने पुन्हा एकदा तळमळिचे युवा अभ्यासु व्यक्तिमत्त्व मनोहर हनवते यांच्यावर विश्वास ठेवून ग्रामसभेतुन बिनविरोध तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून सलग तिसऱ्यांदा निवड केली आहे.नुकतीच चंदनखेडा येथे गावातिल नागरिकांची ग्रामसभा पार पडली.

या ग्रामसभेच्या हे अध्यक्षस्थानी गणपत डुकरे, गावचे सरपंच नयन जांभुळे, उपसरपंच्या भारती उरकांडे, ग्रामसेवक के.डि.पाटिल.पोलिस पाटिल,समिरखान पठाण, ग्रामपंचायत सदस्या आषा नन्नावरे , श्वेता भोयर, प्रतिभा दोहतरे, रंजना हनवते,नानाजी बगडे,बंडु निखाते, तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक महिला व युवक उपस्थित होते.ग्रामसभा आटोपताच मित्र मंडळींकडून नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहर हनवते यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी माजी उपसरपंच विठ्ठल हनवते,माजी उपसरपंच डेविड बागेसर, लोकेश कोकुडे, सिंगलदिप पेन्दाम, मंगेश नन्नावरे,सुनिल भोयर,शुभम भोस्कर, राहुल कोसुरकार, आशिष हनवते, कुणाल ढोक, अमोल महागकार,हेमराज श्रीरामे,शरद श्रीरामे,राजेंद्र धात्रक, रामचंद्र केदार, किशोर गायकवाड,बालाजी महागमकार,शाहरुख पठाण,कदिर पठाण, हुसेन शेख,अमर बागेसर, अरुण हनवते,उपस्थित होते.

Share News

More From Author

मेडीकेअर हॉस्पिटलचा भावनिक उपक्रम बेटी बचाव बेटी पढाओ

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तारण घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हे दाखल करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *