🔹शेतकऱ्यांच्या बैलपोळा सणाचे औचित्य साधून वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राकरिता स्पर्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.30 ऑगस्ट) :- आपला देश हा कृषिप्रधान असून यात शेतकरी, शेती आणि बैल याचं एक अनोख नात आहे. यावर्षी राज्यात 2 सप्टेंबर रोजी पोळा हा शेतकरी बांधवांचा लोकप्रिय सण असून या दिवशी बैलाची सजावट करून त्याची पूजा शेतकऱ्यांकडून केली जाते. बैल हा शेतकऱ्यांचा मित्र असून तो शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबत असतो, घाम गाळत असतो. याची कृतज्ञता म्हणून शेतकरी बांधवांकडून बैल पोळा उत्साहात साजरा केला जातो.
वाढदिवस व बैल पोळा सणाचे औचित्य साधून वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे युवा नेते किशोर टोंगे यांनी बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून बैलजोडी सजावट स्पर्धेत निवड झालेल्या शेतकरी बांधवांना विविध जीवनावश्यक वस्तू 8 सप्टेंबर ला किशोर टोंगे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भेट स्वरुपात देण्यात येणार असल्याची माहिती किशोर टोंगे यांनी दिली. या स्पर्धेचे नियम ठरविण्यात आले असून सजावट केलेल्या बैलजोडी चे फोटो त्यांच्या मोबाईलवर व्हाटसअप करावयाचे आहेत.
शेतकरी हा आपल्या काळ्या मातीतून सोन उगवण्यासाठी रात्रंदिवस राबत असतो आणि त्याला तितकीच तोलामोलाची साथ बैल देत असतात त्यांच्या कृतज्ञतेपोटी शेतकरी आपल्या बैलांची सजावट करतो त्यांना गोडधोड खाऊ घालतो व त्यांची पूजा अर्चा करत असतो. त्यांच्या या आनंदात सहभागी होण्याच्या दृष्टीने व त्यांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने मागील वर्षीपासून या उपक्रमाची सुरवात केली असून गतवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी बैलजोडी सजावट स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन किशोर टोंगे यांनी केले.
या स्पर्धेत प्रथम बक्षीस फ्रिज, द्वितीय टीव्ही तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिक्सर असून असेल एकूण 56 बक्षिसे वितरित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.