सकल हिंदू समाजतर्फे वरोऱ्यात ऐतिहासिक दहीहंडी महोत्सव सम्पन्न 

✒️हरीश केशवाणी वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.29 ऑगस्ट) :- सकल हिंदू समाजा तर्फे दि.27 ऑगस्ट रोजी मंगळवार ला सायं. ठीक 6:00 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती च्या भव्य मैदानावर गोकुळाष्टमी च्या पर्वावर यावर्षी पहिल्यांदा वरोरा शहरात भव्य दिव्य स्वरूपात दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात महाआरतीने करण्यात आली.

सर्व उपस्थितांना टिकला लावण्यात आला, त्यानंतर वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली, ज्या मध्ये 90 पेक्षा जास्त बाळ गोपाळा नी या स्पर्धे मध्ये भाग घेतला. उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या बाळ गोपाळाला पारितोषिके देण्यात आले, ज्यात सर्वांना शाळेची बॅग, बुक आणि इतर साहित्य देण्यात आले.

आणि उत्कृष्ट वेषभुषा करणाऱ्या बाळगोपाळ विजेत्यांना सायकल चे वाटप करण्यात आले.त्यानंतर शहरवासियांनी दहीहंडीचा थरार अनुभवला. यात शीतला माता मंडळ बाबुपेठ यांनी प्रथम क्रमांक पटकाविल्यामुळे प्रथम पारितोषिक म्हणून 31000/-₹ प्रदान करण्यात आले तर दुसरे पारितोषिक हनुमान व्यायामशाळा मंडळ वरोराला 21000/-₹ मिळाले तर तिसरे पारितोषिक बजरंगदल शाखा वरोरा यांना 11000/-₹मिळाले. बजरंग दल ने मिळालेले 11000/-₹ गौरक्षनासाठी दान दिले, त्यांचा या कार्यासाठी अनेक स्तरावरून कौतुक होत आहे.

सर्व बालगोपाल, माताभगिनी आणि स्पर्धक तसेच वरोरावासी पारंपारिक आयोजनाने सुखावले आहे. दही हांडी कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात लोकांची गर्दी पाहावयास मिळाली. या कार्यक्रमात रोडमलजी गहलोत (vhp अध्यक्ष),राकेश त्रिपाठी ( विदर्भ प्रांत प्रमुख),अभिषेक मोटलग,डॉ सागर वझे,डॉ विवेक तेला,डॉ राजेंद्र ढवस,डॉ रमेश राजूरकर,किशोर टोंगे,चेतन कुटेमाटे,विलास नेरकर इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.