🔸वनविभागाच्या नियोजनशून्य व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचे लाखों रुपयाचे नुकसान, भरपाई त्वरित देण्याची मागणी
✒️आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.28 ऑगस्ट) :- मागील अनेक वर्षांपासून भद्रावती तालुक्यातील वन विभागाच्या परिसराला लागून असलेल्या शेकडो एकर शेतातील पीक मोठ्या प्रमाणात डुक्कर व चितळ हरणं हे खाऊन टाकतात त्यामुळे दरवर्षी या परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतो, पर्यायाने वाघाच्या भीतीने जीव मुठीत घेऊन या परिसरातील शेतकरी रात्रीला जागली जातात की आपल्या शेतात जंगली प्राणी येऊ नये, पण किती दिवस हे असेच चालणार असून या संदर्भात वन विभागाने कायमस्वरूपी तोडगा काढून शेतकऱ्यांचे आजपर्यंत जे नुकसान झाले त्यांची भरपाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आताच्या चालू शेती हंगामात (वर्षात) कोकेवाडा तुकूम परिसरातील प्रतीक खिरटकर व इतर शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीन व कापूस मोठया लागवड केली व पिके मोठे झाली असता जंगलातील वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातला.
यामध्ये विशेषता सोयाबीनचे पिकचं डुक्कर चितळ व हरीण यांनी फस्त करून टाकल्याने शेतकऱ्यांचे लाखों रुपयाचे नुकसान झाले आहे, या संदर्भात वन अधिकारी चिवंडे यांना संपर्क साधला असता त्यांनी वनविभागाकडे करा आम्ही पाहणी करू असे म्हटले आहे, दरम्यान वन विभागाने या बाबतीत त्वरित नुकसान भरपाई दिली नाहीं तर या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना घेऊन मोठे आंदोलन करू असा इशारा प्रतीक खिरटकर यांनी दिला आहे.