✒️सारंग महाजन बुलढाणा Buldhana प्रतिनिधी)
बुलढाणा (दि.20 ऑगस्ट) :-
दि. 11 ऑगस्ट रोजी जालना येथे झालेल्या माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती महामेळाव्यात धाराशिव येथील मांजरा नदीच्या काठावर वसलेले आणि बीड व धाराशिव घ्या सिमेवर असलेले पारगाव ( मोटे) गावचे रहिवासी सध्या श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय लांजेश्वर येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री अतुल शंकर गायकवाड यांची समितीच्या धाराशिव जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली.
पारगाव खेड्यात जन्मलेल्या मुलगा आई वडील अडाणी परंतु रुढी परंपरेनुसार एकत्र कुटुंब वडिलांचा शेळीपालन,ब्रास बँड शेती व्यवसाय सात मुलांचा आणि तिनं मुलींचा सांभाळ आणि शिक्षण म्हणजे एक अग्नी दिव्यच.
परिस्थितीला डगमगता पाचवी पर्यंतचे शिक्षण पारगाव लाच. मनात खून गाठ बांधून हा पट्ट्या खेड्यातून बीड शहरात आला आणि पुढील शिक्षण घेऊन आज कला शिक्षक या पदावर आहे. अतुल सरांना मित्रपरिवार नातलग हे ” मास्तर “या नावाने ओळखतात. अतुल सर हे एक चांगले कलाकार, गायक , वादक ,रांगोळी काढणे, फेटा बांधणे आणि इंटरनॅशनल वेलनेस कोच आहेत .तसेच अनेक चित्रपटात मराठी वेबसिरीज मध्ये त्यांनी अनेक पात्र निभावले आहेत.. सध्या ते अनेक विद्यार्थी निस्वार्थ पणाने घडवत आहेत.
त्यांना बिझनेस मध्ये सुद्धा जास्त रुची आहे. असे सर्वांना मदत करणारे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री अतुल शंकर गायकवाड यांची माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती धाराशिव जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली निवडीबद्दल पत्रकार सारंग महाजन व पुणे पत्रकार संतोष लांडे व धाराशिव बीड शहरातील मित्र परिवार यांनी अतुल सरांचे अभिनंदन केले.. त्यांच्या या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.