अंधारातून प्रकाशाकडे मधु तारा प्रत्येकाकडे

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.20 ऑगस्ट) :- मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन यांच्या माध्यमातून मु.पो.सावडी.तालुका. करमाळा.जिल्हा सोलापूर.या गावी श्री हिरा भारती महाराज अखंड हरिनाम सप्ताह मध्ये मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले.

मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे यांच्या प्रयत्नाने तसेच एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय हडपसर पुणे यांच्या करमाळा येथील श्री संदीपजी चव्हाण आणि डॉक्टर्स टीमच्या सहकार्याने गावातील असंख्य नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच १८ रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी नोंदणी झाली.

गावातील प्रतिष्ठित पुणे येथील त्रिमूर्ती केटरर्स चे प्रमुख श्री सचिनजी देशमुख.आणि बालाजी एंटरप्राईजेसचे प्रमुख श्री भाऊसाहेब यदवते यांच्या निःस्वार्थ सेवेने तसेच सावडी गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री भाऊसाहेब शेळके तसेच गावातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर यांच्या अथक प्रयत्नाने सप्ताहात हे शिबिर पार पडले.

या वेळी मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांच्या हसते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिबिराची सुरुवात झाली.या वेळी मधु तारा प्रमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.तसेच गिरशजी घाग यांनी अखंड हरिनाम सप्ताहात समाज हीत लक्षात घेऊन नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केल्या बद्दल सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले.मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख यांनी श्री स्वामी समर्थ हे कार्य करवून घेतात असे म्हंटले.

या वेळी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजक मान्यवर यांच्या हस्ते मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे.मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे.राज्यभर पे टू पे सोशल फाऊंडेशनचे बेटी बचाओ बेटी पढाओ या साठी कार्य करणारे श्री गिरीषजी घाग यांचे ट्रॉफी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.