14 ऑगस्टला ध्वजारोहण झाले विद्यार्थांच्या हस्ते

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.16 ऑगस्ट) :- नेहरु विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव बूज येथे हर घर तिरंगा अंतर्गत तीन दिवस ध्वजारोहण करण्यात आले. हर घर तीरंगा अंतर्गत मागील वर्षांपासून वेगवेगळ्या व्यक्तीमार्फत ध्वजारोहण केले जाते. यावर्षीसुद्धा पहिल्या दिवशी 13 ऑगस्टला शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष शेरखाॅ पठान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .

14 ऑगस्टला ध्वजारोहण साठी चार विद्यार्थी निवडण्यात आले यात कु. सुहानी बारेकर ११ अ, कु. दुर्गा रेहकवार ११ ब, पारस निखारे १२ ब, क्रिष्णा सोनार्थी १२ अ, विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या ध्वजारोहण प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक ढाकुणकर सर वरिष्ठ शिक्षक खेडीकर सर, वारे, हटवार, झाडे, खिरटकर, लभाने, दांडेकर तथा कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी उपस्थित होते.

15 ऑगस्ट चे ध्वजारोहण चिमूर एज्युकेशन सोसा.चिमूर चे सदस्य दमडुजी कोसुरकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी शाळेचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा पालक वर्ग उपस्थित होते.