वनविभागा कडून वन्यप्राण्याचा बंदोबस्त करा

🔸 तात्काळ जखमी झालेल्याना मदत द्या

🔹केवलसिंग जुनी शिवसेना उपतालूका प्रमुख (उ बा ठा) यांची मांगणी

✒️शुभम गजभिये चिमूर (Chimur प्रतिनिधी)

चिमुर(दि.8 ऑगस्ट) :- तालूक्यात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्या कडून हमले होत आहे.त्यात एकाच दिवसी पट्टेदार वाघाने चार नागरीकावर हमला करून जखमी केले अश्या प्रकारे अनेक ठिकानी वन्य प्राण्याकडून शेतकरी,गुराठी,किंवा अन्य सामाण्य लोकान वर हमले होत आहे.अनेकांचे जिव गमवावे लागले व अनेक जखमी होउन अपंग झाले आहे.अश्या नागरीकांना वनविभागा कडून तात्काल आर्थिक मद्दत देण्यात यावी.व वन्य प्राण्याचे बंदोबस्त करण्यात यावे.

शेतकऱ्याचे शेतामध्ये जाने व काम करने कटीन झाले आहे.वाघाची व डूकरांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गावा,शहर,घरामध्ये आपले राहण्याचे ठिकान वन्य प्राणी करीत आहे.त्यामुळे नागरीकांचे घराबाहेर निगणे कठीन झाले आहे.शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात लागवटी किंवा उभ्या पिकाची नुसकान वन्यप्राण्या कडून होत असते. तसेच पाळीव प्राण्याचे वन्य प्राण्याच्या हमल्यात ठार किंवा जखमी झालेल्यांची नुसकान भरपाई वन विभागा कडून योग्य प्रमाणात देण्यात यावी.

कधी कुणाचे चेहरे पाहून पंचनामे केली जाते,कुणा कडून टक्केवारी घेतली जाते तर कुना कडून ओली पार्टी घेतली जाते अश्या प्रकारची पंचनामे वनविभागा कडून होत असते.बरेश्या लोकांन नुसकान भरपाई मिळत नाही. अश्या अधिकारी व कर्मचाऱ्याची वरीष्ठ अधिकाऱ्यान कडून चौकसी करून कार्यवाही करण्यात यावी.अश्या प्रकाराची मागणी केवलसिंग जुनी शिवसेना उपतालुका प्रमुख (उ बा ठा) कडून होत आहे.