स्त्री ही अर्थक्रांतीची प्रणेती : रवींद्र शिंदे

Share News

🔹हळदी कुंमकूम व स्नेहमिलन सोहळ्याचे थाटात उद्घाटन

✒️ मनोज कसारे (भद्रावती प्रतिनिधी)

भद्रावती (दि.21 जानेवारी) :- स्त्रियांची आर्थिक क्षमता व योगदान हे खऱ्या अर्थाने कळले ते देशात नोटबंदी लागू झाली त्यावेळी. नोटबंदीच्या वेळेस महिलांच्या पिगी बँक व बटव्यातून जो संचित निधी बाहेर आला, त्यातून त्यावेळी कुटुंबाच्या आर्थिक गरजांची पूर्तता झाली. किंबहुना, महिलांची आर्थिक दूरदृष्टी कुटुंबाच्या लक्षात आली. त्यामुळे महिलांच्या हाती जर कुटुंबाची व व्यवसायाची आर्थिक नाळी दिल्यास स्त्री अर्थक्रांती करु शकते, असे वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे शिवसेना प्रमुख रवींद्र शिंदे म्हणाले.

निमित्त होते वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) येथील वसंत भवनात आयोजित हळदी कुंकुम व स्नेहमिलन सोहळ्याचे.

हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती व मकर संक्रांतीचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा महिला आघाडीतर्फे दिनांक १६ जानेवारी ते २७ जानेवारी पर्यंत हळदी कुंकूम व स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन सुरू आहे. आज (दि.२१) ला सोहळ्याचा ५ वा दिवस शेगाव येथील वसंत भवन येथे पार पडला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नर्मदा बोरेकर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख चंद्रपूर, कार्यक्रमाचे उद्घाटक रवींद्र शिंदे शिवसेना विधानसभा प्रमुख वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्र, प्रमुख पाहुणे दत्ताभाऊ बोरेकर शिवसेना तालुकाप्रमुख वरोरा उपस्थित होते.पुढे बोलतांना रवींद्र शिंदे म्हणाले की शिवसेना प्रत्येक महिलेच्या पाठीशी भावासारखी उभी राहील.

या क्षेत्रातील कोणत्याही महिलेवरिल अत्याचार खपवून घेतल्या जाणार नाही. स्त्रियांनी  शिवसेनेच्या वाघीनी बनावे व स्वतःचा, कुटुंबाचा तथा गावाचा विकास घडवून आणावा. या कार्यात आम्ही सदैव स्त्रियांच्या पाठीशी आहोत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरलाताई मालोकार यांनी केले. यावेळी परिसरातील स्त्रियांची भरगच्च अशी उपस्थिती होती.

Share News

More From Author

संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून स्वयं प्रकाशित व्हा ! – रवींद्र शिंदे

राष्ट्रीय युवा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *