✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.5 ऑगस्ट) :- शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांच्या स्वस्थ्या प्रति जागरूक करण्या साठी तसेच हुष्ट-पुष्ट जनावरांचे कृषि जीवनात महत्त्व समजावत आनंद निकेतन कृषि महाविद्यालय वरोरा येथील कृषीदुतांनी शेगांव (खुर्द) येथे यशस्वी रित्या राबविले लसीकरण शिबीर.
दरम्यान कृषिदुतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ. महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. तायडे, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. पातोंड आणि सहायक प्राध्यापक डॉ. Gajarlawar यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
पशुचिकित्सक डॉ. विकास ताजने यांनी शिबीर आयोजित करण्यात मौल्यवान सहयोग दिला तसेच विद्यार्थ्यांच्या या सामाजिक कार्याचे समर्थन करत व गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने २०० हून अधिक जनावरांना लाळ्या खुरकूत रोगास प्रतिबंध घालण्या करीता त्यांनी कृषिदुत रोहित गलांडे, कुणाल कोहळे,संभव बैद, हर्षल खाटीक, प्रेम बासेवार, सागर जरे तसेच प्रज्वल चटकि यांचे कौतुक केले.