🔹रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवा व रस्ता बांधकाम करण्यास सुरुवात करा
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बूज.(Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बूज (दि.4 ऑगस्ट) :- स्थानिक वरोरा शेगाव चिमूर हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला आहे तर अनेक ठिकाणी अर्धवट काम असल्याने या अर्धवट कामात मोठमोठे खड्डे पडले आहे या खड्ड्यामुळे अनेकांनी आपले जीव गमावले तर काहींनी अपंगत्व स्वीकारले सध्याच्या परिस्थितीमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अर्धवट असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले त्यात पाणीसाचून नागरिकांना ये जा करणे दुचाकी चालवणे चार चाकी चालवणे मोठे ट्रक चालवणे चालकांना कठीण झाले आहे या खड्ड्यामुळे अनेक वाहने पलटी झाले तर छोटे मोठे दररोज अपघात होत आहे .
त्यामुळे दररोज होत असलेल अपघात लक्षात घेऊन नागरिकांचे जीव धोक्यात असल्याचे लक्षात घेऊन येथील युवा तडफदार काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते श्री राजूभाऊ चिकटे यांनी आज आक्रमक चे पाऊल उचलून स्थानिक पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री योगेंद्रसिंग यादव यांच्या मदतीसह सदर काम करीत असलेली केसीसी कंट्रक्शन कंपनी च्या सर्व पदाधिकारी अधिकारी यांना पोलीस स्टेशन येथे बोलावून नागरिकांसमोर रखडलेली काम का करीत नाही ? तसेच रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे का बुजवीत नाही असा सवाल केला असता तेव्हा के सी सी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की भेंडाळा येथील असलेले कॅम्पवर आमचे दोन ट्रक तसेच एक पोकलेन मशीन अडवलेली आहे व ती त्यामुळे के काम बंद अवस्थेत आहे असे सांगितले तेव्हा राजू भाऊ हे आक्रमक होऊन ती अडचण तुमची आहे तुमची वाहने कोणी अडवले यावर आम्हाला कसलाही देणं घेणं नाही.
फक्त आणि फक्त आम्हाला आमचा रस्ता सुखरूप सुरळीत करून घ्या हीच मागणी केली व अधिकाऱ्याला रेटून धरले व अर्धवट असलेल्या रस्त्याची निर्मिती तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवून घ्या नाहीतर तुमच्या कार्यालयासमोर अनेक नागरिकासह आंदोलन करून कार्यालयाची तोडफोड करून अशी तंबी दिली तेव्हा श्री राजूभाऊ चिकटे यांच्यासह यांच्या कार्यकर्त्याची आक्रमक भूमिका लक्षात घेऊन केसीसी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ अर्धवट असलेले काम तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच रस्त्यावर असलेले चिखल याचा बंदोबस्त दोन दिवसात पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली.
तेव्हा आक्रमक असलेले सर्व काँग्रेसचे पदाधिकारी शांत होऊन दोन दिवसाची वाट पाहत आहे दोन दिवसात या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर याचा विपरीत परिणाम केसीसी कंपनीच्या अधिकाऱ्यांना भोगावा लागेल असे सांगितले यावर सर्वांनी एक मत केले व पुढील काम करण्यास संधी दिली . यावेळी गावातील नागरिक तसेच प्रतिष्ठित नागरिक देखील उपस्थित होते तेव्हा आमदार ची धुरा राजूभाऊ चिकटे यांच्या खांद्यावर द्यायची असे मत देखील नागरिकांनी व्यक्त केले.
यावेळी स्थानिक शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री योगेंदरसिग यादव यांच्या मार्गदर्शनात श्री योगेश खामनकर , यशवंत लोडे , नितीन खंगार सरपंच भेंडाळा, सिद्धार्थ पाटील सरपंच शेगाव बूज.प्रभाकर घोडमारे , सोहेल शेख , चंदू जैसवाल , सूमेर शेख , अभिजीत बोंदगुलवार , दुर्गेश नरड, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.