भारतातील पवित्र भूमी हरिद्वार येथील रुड़की येथे रक्‍तदान आणि समाज कार्य करणारे श्री सुरेश प्रभाकर रेवणकर हे अखंड भारत रक्‍तवीर सम्मान – २०२४ ने सन्मानीत

✒️संतोष लांडे पुणें(Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.2 ऑगस्ट) :- देवभूमि उत्तराखंड हरिद्वार रुड़की येथे २१ जुलाई २०२४ चे अखंड भारत रक्‍तवीर सम्मान समारोह २०२४ का आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमात संपूर्ण भारतातील प्रत्येक राज्यातील रक्तदान तथा सामाजिक कार्या करणाऱ्या भारतातील अनेक राज्यातून तसेच नेपाल, भूटान, बांग्लादेशचे रक्‍तदात्याना आणि समाज सेवकाना आमंत्रित करण्यात आले होते.

ह्या भव्य कार्यक्रम सोबत भव्य रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले व मला रक्तदानाबद्धल थोडक्यात बोलण्याचे संधी देण्यात आले , माझ्या एकूण १५८ वेळा रक्तदान ने सगळे प्रभावित झाले आणि त्यातून प्रेरणा घेवून बऱ्याच नाव तरुण रक्तदान करण्यास पुढे आले, आणि एकूण २७८ युनिट रक्‍तदान करण्यात आले हे एक अभिमानास्पद आहे .

आणि महाराष्ट्रातील मुंबई चे घाटकोपर हून श्री सुरेश प्रभाकर रेवणकर , ह्यांचे शोभाराम प्रजापति (भाजपा जिला अध्यक्ष )तसेच मुख्य अतिथी एसपी सैनी ,रुड़की हरिद्वार के आमदार श्री जय भगवान भाईजी ह्यांचा हस्ते अखंड भारत रक्त वीर सन्मान २०२४ ने सन्मानित करण्यात आले.नेपाल चे टीम पदाधिकारी नी माझ्या कार्याचे प्रशंसा करून नेपाल मध्ये होणाऱ्या सन्मान समारोह मध्ये निमंत्रित करणार असल्याचे सांगितले.

ह्या आधीही रेवणकर ह्यांना त्यांचे समजकर्याबद्धल शेकडो वेळा सन्मानीत करण्यात आले आहे , जागृती रत्न, आदर्श रक्तदाता, रोटरी क्लब घाटकोपर तर्फे के. एम पै अवॉर्ड , कर्नाटक येथून जिल्हास्तरीय बरेच पुरस्कार मिळाले आहे.

ह्या अखंड सेवा सन्मान बद्धल मी रुड़की आल इंडिया ब्लड डोनर ट्रस्ट टीम चे अध्यक्ष कवी चौधरी, निखिल पाल, कुलदीप कुमार सैनी, अभिषेक जोशी, विपिन शर्मा व इतर सर्व सभासदांचे आभार मानले.