गडचिरोलीत शनिवारी डिजिटल मीडियावर कार्यशाळा

Share News

✒️ गडचिरोली (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

गडचिरोली (दि.20 जानेवारी):- गडचिरोली : शनिवार, दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजता येथील बळीराजा पॅलेस, चामोर्शी रोड येथील संविधान सभागृह येथे न्यूज पोर्टल आणि डिजिटल मीडियासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  

 या कार्यशाळेत उपस्थितांना डिजिटल मीडिया तज्ज्ञ व पत्रकार श्री. देवनाथ गंडाटे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचे महत्त्व, ऑनलाइन जाहिरात कमाईच्या टिप्स, Google AdSense कसे स्थापित करावे, न्यूज पोर्टल आणि त्यांच्याशी संबंधित कायदे, आदी विषयावर मार्गदर्शन होणार आहेत. या शिवाय संवाद चर्चा होईल. 

VNX आणि My Khabar 24 या न्यूज पोर्टलने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. 

 या कार्यशाळेत डिजिटल मीडिया पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Share News

More From Author

महिला -भगिनी  व सर्वसामान्य जननतेच्या रक्षणासाठी शिवसैनिक सदैव तत्पर : रविंद्र शिंदे 

संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून स्वयं प्रकाशित व्हा ! – रवींद्र शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *