✒️संतोष लांडे पुणे(Pune प्रतीनिधी)
पुणे (दि.27 जुलै) :-
दिनांक 26 जुलै 2024 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मधु तारा प्रमुख मा.श्री नितीनजी शिंदे यांच्या* *मार्गदर्शनाखाली मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख मा.श्री अनीलजी दांगडे यांच्या वाढदिवसानिमित्त एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्याने हडपसर परिसरातील साडेसतरा नळी येथे वृध्द आजी आजोबा माता भगिनी दिव्यांग अशा सर्वच नागरिकांसाठी भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या वेळी पावसाने विश्रांती घेतल्या मुळे पंचक्रोशीतील तसेच जिल्ह्यातून आलेल्या असंख्य नागरिकांनी डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियाचा लाभ घेतला.शिबिराला आशीर्वाद देण्यासाठी व मधु तारा जिल्हा प्रमुख श्री अनीलजी दांगडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ ह.भ.प.आदरणीय भानूदास तुपे महाराज.हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री.चेतन दादा तुपे पाटील.कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मा.श्री गणेश शेठ घुले.हडपसर मा.नगरसेवक आपला माणूस मा.श्री मारुती आबा तुपे.हवेली उप सभापती मा.श्री संदीप भा.तुपे.हडपसर साडे सतरा नळी मा.उप सरपंच मा.श्री रुपेशदादा तुपे पाटील.ग्रा. पं.सदस्य मा.श्री महेशदादा तुपे पाटील.युवा उद्योजक मा.श्री अनिकेतदादा तुपे पाटील. मा.श्री अभिषेकदादा तुपे पाटील.श्री व सौ आदरणीय सोपानकाका तुपे.
शहीद भगतसिंग जीवन रक्षक फाऊंडेशन प्रमुख मा.श्री बचु सिंगजी टाक.आस्क वृध्द निराधार आश्रम प्रमुख मा.श्री दादा गायकवाड.
मधु तारा प्रमुख मार्गदर्शक आदरणीय मा.श्री बारवकर काका.राज्याध्यक्ष दिव्यांग विभाग मा.श्री सलीमभाई शेख.पुणे जिल्हा दिव्यांग महिला प्रमुख सौ.मीनाक्षी ताई शिंदे तसेच असंख्य दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित होते.या वेळी आमदार श्री चेतनदादा तुपे पाटील यांनी मधु तारा सोबत राहून लवकरच हडपसर मतदार संघात राहणारे दिव्यांगांसाठीं महा मेळावा आयोजित करून त्यांचे प्रश्न विधानसभेत मांडून त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करू तसेच दिव्यांग मंत्रालयाच्या अंतर्गत हडपसर पुणे दिव्यांग विभाग ही मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन सोबत राहून करू असे मत या वेळी व्यक्त केले या वेळी मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी आपण आम्हाला हाथ ध्या आम्ही तुम्हाला साथ देऊ असे म्हणताच उपस्थित दिव्यांग नागरिकांनी विठल रुख्मिणी मंदिरात टाळ्याचा गडगडाट करत साक्षात विठू अवतारला असे चित्र निर्माण केले.
या वेळी मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे यांचा वाढदिवस सर्व मान्यवरांच्या व पंचक्रोशीतून शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला.