✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा (Warora प्रतिनिधी)
वरोरा(दि .27 जुलै) :- शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. युवासेना वरोरा भद्रावती विधानसभा तर्फे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविन्द्र शिंदे व युवासेना जिल्हा प्रमुख रोहण कुटेमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रमुख अभिजीत कुडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपतालुका प्रमुख रामानंद वसाके यांच्या नेतृत्वाखाली गावातील तरुणांची फळी उत्कृष्ठ कार्य करत आहे.
साहेबांचा वाढदिवस सामाजिक कार्य करून साजरा करावा. वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे .वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणलीय. आपण एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगनभरारी घेतली, प्रगती साध्य केली.
परंतु आपल्या कृतीने पर्यावरणाचा क्षय होतोय याकडे मात्र दुर्लक्ष केले. याचेच परिणाम आज आपण पाहत आहोत. मानवाने आपल्या अतिरेकी महत्त्वाकांक्षेसाठी सिमेंटची जंगलं वसवली. मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली. याच्याच परिणामी ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आज जगाला भेडसावत आहे. वातावरण बदलामुळे पावसाची अनिश्चितता वाढलीय.
जागतिक तापमानातील वाढीमुळे पृथ्वीवरील मानवाचं, सजीवांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांचा अति वापर, त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे शहरात श्वास घेणं कठीण झालंय.
शुद्ध हवा, ऑक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही. वृक्ष आपल्याला फक्त पाने, फुलेच देत नाहीत, तर आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात. नवी आशा देतात. उमेद देतात. म्हणूनच वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे. वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करा असे प्रतिपादन अभिजित कुडे यांनी केले. यावेळी रामानंद वसाके, रोशन भोयर, प्रफुल्ल गिरडकर, शिवम डवरे, प्रशांत तळवेकर, अमोल आडकीने.
गणेश वसाके, विजय काटवले, गणेश वाढई, नरेंद्र वसाके, विजय सोनुले, मंगेश वसाके, आशिष लालसरे, गौरव येरगुडे, प्रतीक डवरे, विजय येरगुडे, दिपक वाटमोडे,हार्दिक सावरकर,यशोधन वाटगुरे,सावरकर,आकाश शेंडे, वृषभ डवरे, अतुल माळवे, सुरज दोरखंडे,नीलेश लालसरे, सिध्दांत वसाके,गौरव वसाके, मनोज महाडोळे, मयुर वसाके, सौरव वसाके, हंसराज वसाके, व इतर ग्रामवासी या मध्ये हजर होते.