✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा (Warora प्रतिनिधी)
वरोरा(दि.27 जुलै) :- २६ जुलै १९९९रोजी पाकिस्तान विरुद्ध भारतीय सैनिकांनी प्राणांची आहुती देऊन कारगील युद्ध जिंकले , त्या युद्धाची आठवण म्हणून देशात कारगिल युद्ध दिवस म्हणून साजरा केला जातो . चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे येथे एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
शहरातील सर्वच प्राथमिक शाळा, विद्यालय,महाविद्यालयीन शाळांच्या वतीने प्रभात फेरी काढून कारगिल युद्धामध्ये प्राण्यांची आहुती देणाऱ्या जवानांच्या सन्मानार्थ प्रभात फेरी काढून त्यांना मानवंदना देण्यात आली यावेळी वरोरा शहरातील आंबेडकर चौक येथे शाळकरी मुलांना तसेच शिक्षकांना व माजी सैनिकांना टायगर ग्रुप वरोरा तर्फे फळवाटप व पाणीवाटप करण्यात आले.
टायगर गृप हा नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर दिसुन येते येणाऱ्या काळात टायगर गृप मोठी उंची गाठणार असे रिषभ रठ्ठे म्हणाले यावेळी तालुकाध्यक्ष रिषभ रठ्ठे, टायगर गृपचे सदस्य वैभव टिपले, विक्की गवई,ओम कार्लेकर, कृष्णा ठाकरे,नयन ढवस, मारोती नामे अमोल दडमल, प्रसाद गमे ,प्रतिक तिराणकर,व अन्य सदस्य उपस्थित होते.