शेगाव रस्त्याचे तीनतेरा खड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे

🔹दुचाकी चालवणे झाले कठीण

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.26 जुलै) :- वरोरा शेगाव चिमूर महामार्गावरील अनेक ठिकाणी अर्धवट रस्ते आहे तर यात स्थानिक शेगाव बू बस स्टॉप ते कलाकुंज हॉटेल मेनरोड वरील स्मशान भूमी पुल , भेंडळा येथील एस आर के कंपनी कार्यलय समोर , चारगाव खुर्द बस स्टॉप , चारगाव बू येथील पुल जवळ, तसेच राळेगाव येथील बेंबळा फाटा राळेगाव ते गुजगव्हण मेनरोड अश्या अनेक ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अर्धवट काम आहे यात मुरूम माती च मलबा असल्याने दरवर्षी.इथे चिखलाचे साम्राज्य निर्माण होते तरी देखील याची पूर्व उपाय योजना संबंधित कंत्रक्षण कंपनी का करीत नाही . का लोकांचा जीव गेल्यावरच धावपळ करतात करिता जनतेचा तसेच प्रवास्याचा जीव न जावा या करिता पावसाळ्यात पूर्वीच अनेक उपाय योजना कराव्यात. 

         गेले पाच दिवस लोटून देखील पावसाची झळ कमी न झाल्याने व रिम झिम् पावसाच्या सरिने. वरोरा शेगाव , राळेगाव ते गुजगव्हान या मार्गाचे तीन तेरा झाले असून या अर्धवट मार्गातून दुचाकी , चारचाकी , ट्रक बस , चालवीत असताना प्रवाश्यांना तसेच चालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात.

वाहने चालवीत असताना चालकाला गाडी चालवताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो तर रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते असा प्रश्न निर्माण होतो हे रस्ते चुकवीत असताना खड्ड्यांचा बेत अंदाज लागत नसल्याने वाहने देखील पलटी होत असते तर या खड्ड्यांमुळेच छोटे मोठे अपघात देखील होत असते दुचाकी स्वराला तर आपल्या जीवापेक्षा आपल्या कपड्याची अधिक चिंता असते त्या करिता खड्डे चुकविण्याच्या नादात व चीखलमय रस्त्याने अनेक दुचाकी स्लीप होऊन घसरगुंडी होत असतात. त्यामुळे वरोरा शेगाव चिमूर महामार्ग दिवसेंदिवस जीव घेणा रस्ता होत आहे.

विशेष म्हणजे या रस्ता निर्मितीचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून कासवगतीने सुरू असून याचे काम सर्वस्वी एस आर के कंट्रक्षण कंपनी कडे सोपविण्यात आले होते परंतु ही कंपनी चे कर्मचारी देखील हलगर्जी पना करीत असल्याने सदर एस आर के कंपनी ने अर्धवट असलेले काम तात्काळ रित्या पूर्ण करण्यासाठी वास्तव्यात असलेल्या के सी सी कंपनी कडे पूर्ण करण्याचे कंत्राट दिले परंतु ही कंपनी देखील यांच्याच पावलावर पाऊल टाकत ही कंपनी देखील निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे.

के सी सी कंपनी हि देखील प्रवास्याच्या तसेच जनतेच्या जीवावर उठली आहे. शेगाव बूज. मार्गावर अनेक ठिकाणी चिखल खड्डे असून देखील त्याकडे डोळे असून देखील आंधळेपणाचे नाटक करीत आहे. तेव्हा संतप्त प्रवाशी तसेच नागरीक आक्रमक झाले तर के सी सी कंपनी च्या कर्मचाऱ्याच्या तसेच त्यांच्या वाहनाला धोका निर्माण होऊ शकतो.असे मत आज नागरिकांच्या तोंडून ऐकविण्यात आले आहे.

तेव्हा भविष्यात होणाऱ्या विपरीत परिणाम टळावा या करिता या रस्त्याची निर्मिती तात्काळ करावी व न केल्यास सदर के सी सी कंपनी वर मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करून कंपनीला काळ्या यादीत टाकून कंपनीला बळतर्फ करावे अशी मागणी नागरिकांसह प्रवाशी करू लागले आहेत.