🔹निसर्गाचा डाव कसला नेहमी खेळतोय शेतकऱ्यांच्या पिकाशीन हा खेळ कसला निसर्गाचा
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.24 जुलै) :- अतिवृष्टीमुळे चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच शेतमाल पाण्याखाली आले तर शेतकऱ्यांचे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले तर काही पिक माती खाली दबले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे या संकटातून बाहेर काढण्यासाठी झालेल्या नुकसानीचे सर्व करून तातडीने मदत करण्यात यावेत यावे. अस्मानी संकट नेहमी शेतकऱ्यांची परीक्षा घेत असतात असेच याही वर्षी घडले आहे.
यावर्षी अस्मानी संकट शेतकऱ्याकडेच लक्ष केंद्रित करत शेतकऱ्याच्या पिकासोबत खेळण्याचा डाव त्या निसर्गाने रचला आहे.त्या निसर्गाने यावर्षी त्या शेत पिकाचे निसर्गाने मोठे नुकसान केले चिमूर तालुक्यातील अतिदृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले तरी झालेले नुकसानाचे सर्वे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केली आहे.