कोकेवाडा किनाळा गावातील शेतपीक धोक्यात

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू.(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.22 जुलै) :- स्थानिक शेगाव येथून तसेच वरोरा तालुक्यातील कोकेवाडा किन्हाळा अर्जुनी चारगाव खुर्द व अन्य गावातील अनेक शेती आजही पाण्याखाली आहे शिवाय चारगाव धरणाचे ओव्हरफ्लो पाणी इरई नदीला वाहत असल्याने या नदीचे पाणी सैरावैरा मिळेल त्या दिशेने वाहत असल्याने या नदीलगत असलेले अनेक शेती आजही पाण्याखाली असल्याने अनेक शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आहे त्यात काही पिकं सडक्या अवस्थेत येत असल्याचे भयानक चित्र पाहायला मिळत आहे.

तसेच कोकेवाडा येतील युवा शेतकरी प्रतीक अभय खिरटकर या शेतकऱ्याचे 16 एकर शेत जमीन ही आजही पाण्याखाली असल्याने यांच्या शेतात असलेले सोयाबीन कापूस धान पऱ्हे नष्ट होण्याच्या मार्गात लागली आहे तेव्हा येथील शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे समजते यासोबत यांच्या शेतासोबत अनेक गावातील शेती देखील पाण्याखाली असल्याने सर्वस्वी शेतकरी चिंतेत सापडलेला आहे. 

         चारगाव धरण गेल्या चार दिवसापासून ओव्हर फ्लो झाल्याने यासोबत दररोज येत असलेल्या पावसाने नदीचा पूर कमी होत नसल्याने या पुराचे पाणी मिळेल त्या मार्गाने सैरावैरा धावत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी साचलेले आहे चार ते पाच दिवस लोटून देखील शेतीतील पाणी कमी होत नाही तेव्हा पाण्यात बुडून असलेले शेती सडण्याच्या मार्गात आहे शिवाय आधीच या परिसरातील शेतकरी कर्जबाजारी तसेच सावकारी कर्ज काढून शेती केली .

परंतु या मुसळधार पावसाने तसेच पुराच्या पाण्याने शेतातील पीक अधिकच धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिका अधिक वाढत आहे गेल्या पाच दिवस लोटून देखील चारगाव खुर्द अर्जुनी कोकेवाडा किनाळा धानोली अशी अनेक मार्ग बंद असल्याने ह्या परिसरात पूर पाहणी करता तसेच पाण्याखाली असलेली शेती पाहण्याकरिता अजून पर्यंत कोणते ही शासनाचे अधिकारी आले नाहीत.

तेव्हा या परिसराची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून नुस्कान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ रित्या नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी प्रतीक अभय खिराटकर यांच्या सह अन्य पीडित शेतकऱ्यांनी केली आहे.