सततच्या पावसामुळे गाव खेड्यात रोग राईचे प्रमाण 

🔹गावोगावात आरोग्य शिबीर राबवा…ईश्वर नरड यांची मागणी

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.21 जुलै) :- जिल्ह्यामध्ये चार-पाच दिवसापासून सातत्याने अति मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे वरोरा तालुक्यातील गाव गावच्या एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे गावकऱ्यांचे दैनंदिन जीवनमान विस्कळीत झालेली आहे.

शेगांव बु परिसरात अर्जुनी ,धानोली गावांना पुराचा मोठा धोका निर्माण झाला.त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या पिकाचे व शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नदी, नाल्यालगतच्या शेती पाण्याखाली आली पीके पाण्याखाली असल्यामुळे पुरामुळे शेतातील माती वाहून गेली पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाने व कृषी विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांच्या पिकाचे व शेतात झालेल्या नुकसानाचे नुकसान भरपाई देण्यात यावी .

त्याचप्रमाणे गावातील घरी अति पावसामुळे पडझड झाली त्यामुळे त्यांच्या घराचे आर्थिक मदत देण्यात यावी. गावामध्ये आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला डेंगू ,मच्छर यासारख्या संसर्गजन्य आजार आळा घालण्यासाठी गावागावात फवारणी ,औषधी उपचार शिबिरे घेण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते ईश्वर नरड यांनी केले.