✒️ मूल(Mul विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
मूल (दि.14 जुलै) :- दिनांक 13 जुलै ला विद्यार्थ्यांना निवडणूक पद्धती बद्दल व त्याच्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी शालेय स्तरावर शालेय मंत्रिमंडळाची आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी ची निवडणूक घेऊन त्यांना भारतीय लोकशाही बद्दल माहिती देण्यात आली.
शाळेच्या मुख्यद्यापीका रिमा कांबळे यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक बद्दल माहिती देऊन योग्य प्रतिनिधी निवडण्याचे महत्व सांगितले.
निवडणूक अधिकारी मनहुन अशपाक सय्यद, भूपेंद्र मोटघरे, वामन कवाडकर यांनी काम पाहिले.
शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी सहकार्य केले.