नेहरू विद्यालय येथे डेपो मॅनेजरच्या हस्ते विद्यार्थ्यांना पास वितरित

🔹डेपो मॅनेजरच्या हस्ते विद्यार्थ्यांना पास मिळणारी ठरली तालुक्यातील प्रथम शाळा

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.1 जुलै) :- आज दिनांक १ जुलै २०२४ पासून संपूर्ण राज्यात शाळेच्या नवीन सत्राला सुरुवात झाली. 

त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे शाळकरी विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात एसटी चा पास उपलब्ध करून दिला जातो. आजपासून शाळेच्या नवीन सत्राला सुरुवात होत असताना विद्यार्थ्यां वर आर्थिक भुर्दंड पडू नये म्हणून शाळेच्या पहिल्याच दिवशी एसटी विभागातर्फे वरोरा तालुक्यातील नेहरू विद्यालय शेगाव बु येथे स्वतः डेपो मॅनेजर यांच्या हस्ते पासचे वितरण करण्यात आले. 

त्यावेळी वरोरा ची डेपो मॅनेजर पी. एस. वर्धेकर, पास वितरक बाबू प्रेम शेंडे, शाळेचे मुख्याध्यापक बालाजी ढाकुणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेरखान पठाण, खेडेकर, विजय वारे आदि शिक्षक वृंद उपस्थित होते शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये पास उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक वेगळाच आनंद पाहायला मिळत होता.