बापरे….आरोपीने घेतला पोलीस कस्टडीत गळफास

🔹वरोरा पोलीस स्टेशनं कष्टडीत झालेल्या या आत्महत्तेच्या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक घटनास्थळी. पोलीस महानिरीक्षक पण येण्याची शक्यता

✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.30 जून) :- प्रेम विश्वात हरवलेल्या व एकमेकांच्या दिलावर राज्य करणाऱ्या प्रेयसी किंवा प्रियंकारांनी एकमेकांस दगफटका दिला तर नंतर काय होतं याचे अनेक किस्से चित्रपटातील कथेतून तर कधी प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे किस्से वर्तमानपत्रातून पाहायला व वाचायला मिळत असतें अगदी अशाच चित्रपटातील प्रेमकथेचा थरारक प्रकार वरोरा शहाराला लागून असलेल्या आनंदवन येथे घडला होता त्यात प्रेमभंग झालेल्या समाधान माळी यांनी 24 वर्षीय प्रेमिका आरती दिगंबर चंद्रवंशी या तरुणीचा 26 जून ला क्रूरपणे खून केला होता दरम्यान आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि त्याला न्यायालतात हजर केले असता त्याला काही दिवसाची पोलीस कस्टडी सुनवण्यात आली होती, मात्र पोलीस कष्टडीत असतांना समाधान माळी यांनी आज सकाळी आत्महत्ता केल्याची खळबळजनक घटना घडली असून वरोरा पोलीस स्टेशनं कष्टडीत झालेल्या या आत्महत्तेच्या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहचले आहे तर पोलीस महानिरीक्षक पण येण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

आनंदवन येथील आनंद वनातील आश्रमात आई वडील यांच्यासोबत राहणाऱ्या 24 वर्षीय आरती दिगंबर चंद्रवंशी या तरुणीचे स्वतःचा उपचार करण्यासाठी आनंदवनात आलेल्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात राहणाऱ्या समाधान माळी सोबत प्रेम जुळले होते, दरम्यान प्रेमाच्या आनाभाका घेऊन लग्न करण्याचं वचन एकमेकांना देऊन दोघेही प्रेमविश्वात वावरत होते, पण नियती वेगळं काही करत होती आणि आरतीचे प्रेम दुसऱ्यावर जडले व समाधानवरून लक्ष हटले, इथेच प्रेमात ठिणगी पडली आणि मग सुरू झाला प्रेमाचा प्रतिशोध, दिनांक 26 जून ला आरतीचे आई वडील घरी नसल्याचा फायदा घेत समाधान आरती च्या घरी शिरला आणि दोघात कडक्याचे भांडण होऊन आधीच खून करण्याचा मनसूबा घेऊन आलेल्या समाधान याने आरतीवर चाकूने सपासप वार करून खुन केला दरम्यान त्यातच तीचा प्राण गेला, रात्री 8 ते 8.30 दरम्यान आरतीचे आई-वडील घरी आले असता बाथरूम जवळ रक्ताच्या थारोळ्यात आरतीचा मृतदेह पडला होता, आरतीची हत्या झाली ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली, लगेच पोलिसांना खबर देण्यात येऊन मृतदेह छववीच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. आरोपी समाधान पोलिसांना सापडला आणि त्यांनी गुन्हा कबूल केला, दरम्यान त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला काही दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली मात्र आज सकाळी त्याने जुत्याच्या लेस ने आपला गळा आवळून आत्महत्या केली, ही बाब सकाळी पोलिसांच्या लक्षात येताच पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला असून चौकशी सुरू आहे.