🔹नियमित पिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान केव्हा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे
✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा(Warora प्रतिनिधी)
वरोरा(दि.28 जून) :- महाराष्ट्र सरकारने सन २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना मंजूर केली होती तसेच युती सरकारने तीच योजना महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना म्हणून राबविली त्यापैकी राज्यातील सहा लाख 56 हजार शेतकरी आजही कर्जमाफी पासून वंचित असून ते बँकेमध्ये चकरा मारत असुन नियमित पिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार अनुदान तात्काळ द्या अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांनी तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन पाठवले आहे. सतत नापिकी तसेच पूर आल्याने अनेक शेतकऱ्यांचे पीक जमीन दोस्त झाले यात सोयाबीन व कापसाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच हाती आलेल्या मालाला कवडीमोल भावाने विकावे लागते यातच शेतकरी कर्ज फेडणार तरी कसे या विवंचनेत शेतकरी आहे .
शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना व महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना अजून पर्यंत राज्यातील पाच लाख 56 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही तसेच ज्या शेतकऱ्यावर थकीत कर्ज आहे त्यांचे व्याज माफ करावे व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार अनुदान देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली होती .
त्या योजनेचा सुद्धा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही , चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात तात्काळ या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा याकरिता भरीव तरतूद अर्थमंत्र्यांनी करावी व शेतकऱ्यांना याचा लाभ द्यावा अन्यथा जिल्ह्यात मनसे स्टाईल ने रस्त्यावर मोठ आंदोलन उभारेल असा इशारा राजु कुकडे यांनी दिला आहे.यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.