आनंदवनात प्रेम प्रकरणातून विवाहितेचा धारदार शस्त्राने खून 

🔸आनंदवनात पहिल्यांदाच घडली अशी घटना

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.28 जून) :- 

दृष्टीहीन वडिलांना घेऊन आई सेवाग्राम येथे उपचारासाठी गेल्याने विवाहित महिला घरी एकटीच होती यादरम्यान अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडली आरती दिगंबर चंद्रवंशी (वय 24)असे मृत महिलेचे नाव आहे.वरोरा लगतच्या आनंदवनात अशा प्रकरणाची खुणाची पहिलीच घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत आरतीचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता परंतु काही दिवसापूर्वी ती आपल्या आई वडीलाकडे वास्तव्याला होती घटनेच्या दिवशी बुधवारी महिलेचे वडील आपल्या पत्नीसोबत सेवाग्राम येथे उपचारार्थ गेले होते. रात्री आई-वडील घरी पोहोचले तेव्हा घराचा दरवाजा उघडा होता दृष्टीहींन वडील व आईने मुलीला आवाज दिल्यानंतही ती बोलत नसल्याने बाहेर शोध घेतला. मात्र मुलीचा पत्ता लागला नाही काही वेळाने वडील बाथरूम मध्ये गेले असताना त्यांना मुलीचा स्पर्श झाला .त्यांनी पत्नीला आवाज दिल्यानंतर आईला मुलीचा मृत्यूदेह बाथरूम मध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले मृतक महिलेच्या गळ्यावर शस्त्राचे वार दिसून आले.

याबाबत तात्काळ पोलीस विभागाला माहिती देण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व घटनेची चौकशी सुरू केली. 

दरम्यान गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाचे निरीक्षण करून मृत्यूक महिलेच्या वडिलाची विचारपूस करून माहिती घेतली श्वान पथकाला पाचारण करण्यात आले नेमकी घटना कशी घडली कोणत्या कारणावरून खून करण्यात आला ,याबाबत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत आनंदवन हे सुजाण नागरिकांचे आश्रयस्थान असून या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती समाजकार्यात व्यस्त असतो त्यातच ही हत्येची घटना घडल्याने सर्वांना धक्का बसला आहे विशेष म्हणजे श्रद्धेय बाबा आमटे यांनी आनंदवनाची निर्मिती केल्यापासून आतापर्यंत कधीही आनंदवनात अशी विदारक खुनाची घटना घडली नाही. त्यामुळे आनंदवन कुटुंबाला देखील या घटनेने मोठा धक्का बसला आहे याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध वरोरा पोलिसात भांदवि च्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

वरोरा पोलिसांनी तंत्रज्ञान व ह्यूमन इंटेलिजन्स च्या आधारे 24 तासाच्या आत आरोपीचा शोध घेऊन अटक केली समाधान माळी (वय 20 रा.चोपडा, जळगाव) असे आरोपीचे नाव असून सध्या तो वरोरा येथे राहत आहे आरोपीने गुन्हा कबूल केला असून गुन्हाचा हेतू व पद्धत निष्पन्न करण्याकरिता पुढील तपास वरोरा पोलीस करत आहे.