नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता रखडल्या मुळे शेतकऱ्यांची नाराजी 

✒️नितेश केराम कोरापना(Korpana प्रतिनिधी) 

कोरपना(दि.27 जून) :- 

राज्यात 18 जून रोजी मा श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी pm किसान सन्मान निधी योजनेचा 17 हप्ता हा वाराणसी येतुन वितरित करण्यात आला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्याच दिवशी नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथा हप्ता देखील वितरित करण्याचा आदेश काढला होता परंतु राज्य सरकार नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथा हप्ताचे अजूनही 2000 हजार रुपये वितरित केले नाही आज पावतो राज्यातील शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथा हप्ता कधी जमा होईल याची आतुरत्याने वाट बगत आहे.

परंतु अजूनही राज्य सरकार कडून कुठल्या गोष्टीची प्रतिक्रिया येऊन नाही राहली आज पावतो पावसाळा सुरु झाला आहे अजूनही नमो शेतकरी सन्मान योजनेचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात नाही आले आज राज्यातला शेतकरी संकटात सापडला आहे आणि सरकार यांच्या कडे दुर्लक्ष करीत आहे असंच जर होत असेल तर शेतकऱ्यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा देण्यात आला.