ऐवढा सत्तेचा माज बरा नाही…किशोर टोंगे यांची बरांज प्रकरणावर प्रतिक्रिया

🔸दहा वर्षांपासून सत्तेत असून प्रकल्प मार्गी नाहीत मात्र निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करून जनतेची दिशाभूल 

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.19 जून) :- 

गेल्या दहा वर्षात तरुण्णांच्या हाताला काम देण्याऐवजी त्यांची दिशाभूल करून काळे धंदे, अवैध दारू आणि ठेकेदारांचे हित बघणारे लोक आता मिळालेल्या सत्तेचा वापर विधायक मार्गाने विकास कामे करण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी अधिकाऱ्यांना मारहान करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप किशोर टोंगे यांनी केला आहे.

अनेक दिवसापासून उपोषण आणि आंदोलन सुरु होते तरी देखील स्थानिकांना न्याय देण्याचं काम केलं नाही.परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते पालकमंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी प्रश्न मार्गी लावले होते. त्याचा फायदा देखील काही दिवसात स्थानिकांना मिळणार आहे. आंदोलन करून स्वतःचा फायदा करून घेण्याचं आणि स्थानिकांसाठी आंदोलन केलं ते दाखविण्यासाठी काम केलं आहे.

परंतु आंदोलनकर्त्यांनी मुद्धे कायदेशीर रित्या मार्गी न लावता.खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली आहे.मागील दहा वर्ष आपण या मतदार संघात खासदार आणि आमदार म्हणून सत्तेत होते तेव्हा तुम्हाला प्रश्न का दिसले नाही? आणि आता निवडणुका बघता आंदोलन करण्याचं कारण काय? असा सवाल वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टी चे नेते किशोर दादा टोंगे यांनी केला आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे अन्यथा असे अनेक प्रकरण मतदार संघासाठी धोक्याचे ठरू शकते असे सांगितले आहे.