सुषमा शिंदे यांच्या वाढदिवसी दोन पाल्यांना घेतले शैक्षणिक दत्तक

🔹स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचा उपक्रम स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजनेअंतर्गत शैक्षणिक दत्तक

✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadrwati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.15 जून) :- तालुक्यातील मुरसा येथील पितृछत्र हरविलेल्या कुटुंबातील समिक्षा विनोद बोरकुटे व धनश्री विनोद बोरकुटे या दोन मुलींना आज स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूर च्या कोषाध्यक्षा सुषमा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज (दि.१५) ला ट्रस्टचे उपक्रम स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजनेअंतर्गत शैक्षणिक दत्तक घेण्यात आले. यांचे पुढील शिक्षणाची जबाबदारी ट्रस्टनी स्विकारली आहे.

              स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूर हि समाजातील सर्व घटकातील गरीब गरजू नागरीक, अनाथ, पित्रृछत्र मातृछत्र हरविलेली मुले तसेच समाजातील दुर्बल घटकातील नागरीकांकरीता कार्य करीत आहे. ट्रस्टव्दारा चालविण्यात येत असलेल्या आठ विविध योजना आहेत.

वंदनीय राष्ट्रस्ंत तुकडोजी महाराज अभ्यासिका योजना, विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदे विषयक मार्गदर्शक उपक्रम, श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान, हिंदुहृदय वंदनीय बाळासाहेब ठकारे दिव्यांग योजना, डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना, अनाथाची माय स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना, कै. म ना पावडे क्रिडा स्पर्धा या उपक्रम व अभियानाव्दारे समाजातील सर्व घटकातील नागरीकांना लाभ देण्यात आले आहे व देण्यात येत आहेत. ट्रस्टच्या उपक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे तसेच अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी सर्व घटकातील नागरीकांना केले आहे.

           यावेळी मुरसा येथील लक्ष्मी विनोद बोरकुटे यांना कुटुंबातील पाल्यांना ट्रस्टव्दारे शैक्षणिक दत्तक घेतल्याचे रितसर पत्र देण्यात आले. याप्रसंगी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूर चे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, कोषाध्यक्ष सुषमा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नरेन्द्र पढाल, सुनिल मोरे, अरुण घुगुल आदी उपस्थित होते.