✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.28 मे) :-
महाराष्ट्र सरकार यांनी शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ दिला पण पिक विमा योजनेचे रक्कम केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.महाराष्ट्र सरकार यांनी एक रुपयात पिक विमा परंतु विम्याची रक्कम कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी नेते विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे.
मोठ्या प्रमाणात चिमूर तालुक्यात व चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट पाऊस झाल्याने हरभरा , ज्वारी, गहू, मुंग तथा मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पाऊस झाल्याने नुकसान झालेल्या रब्बी पिके ९०%उध्दवस्त झाले होते.पिक विमा कंपनी कडून नुकसानाचे पंचनामे सुध्दा करण्यात आले.पण विमा धारक शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीला शेतकऱ्यांनी ७२ तासाचा आत तक्रार सुध्दा केली.शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ कधी मिळेल असा प्रश्न शेतकरी नेते उमरे यांनी उपस्थित केला आहे.
सततच्या झालेल्या पावसामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसला आहे.मात्र पिक विमा कंपनी कडून यांची दखल अद्याप घेण्यात आली नाही.विक विमा कंपनी ने त्वरित नुकसानग्रस्त पिक विमा धारक शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ देण्यात यावे.अशी मागणी प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केली आहे.