ध्यान व नामस्मरण आत्म्याला शुध्द करणारा व्यायाम : परम पुज्य भागवतमनिषी श्री मनिष महाराज

🔸श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व परम पुज्य भागवत सत्संग सोहळा संपन्न

🔹स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे आयोजन

✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.13 मे) :- 

ज्याप्रमाणे आपण शरीराला समृध्द ठेवण्यासाठी विविध आवडीच्या पदार्थांचे सेवन करतो, शरीरासाठी शारीरिक व्यायाम करतो, त्याच प्रमाणे मनाची शुद्धी व आत्म्याचा व्यायाम करण्यासाठी ध्यान व प्रभूचे नामस्मरण करावे, असे परम पुज्य भागवतमनिषी श्री मनिष महाराज यांनी सांगितले. प्रसंग होता येथे आयोजित सत्संग सोहळ्याचा.

स्थानिक गौरी ग्रीन लॉन, श्री मंगल कार्यालय येथे साडे तीन मुहूर्तापैकी एक अक्षय तृतियाच्या पावन पर्वावर दिनांक १० मे रोज शुक्रवारला श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व परम पुज्य भागवत सत्संग सोहळा संपन्न झाला.

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंद चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूर तथा सहआयोजक श्री गुरुदेव सेवा मंडळ वरोरा, श्री गरुदेव सेवा मंडळ भद्रावती, श्री संत सदगुरु जगन्नाथ महाराज मठ वरोरा, श्री संत सदगुरु जगन्नाथ महाराज मठ भद्रावती, श्री जगन्नाथ महाराज मठ भांदेवाडा, संत झिंगुजी महाराज देवस्थान समिती भद्रावती, सहजयोग ध्यान साधना केंद्र वरोरा, सहजयोग ध्यान साधना केंद्र भद्रावती, अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघ वरोरा, अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघ भद्रावती, श्री राम जन्मोत्सव समिती भद्रावती, श्री हनुमान जन्मोत्सव समिती भद्रावती, श्री गुरुजी फाऊंडेशन चंद्रपूर, संत निरंकारी सत्संग मंडळ वरोरा, संत निरंकारी सत्संग मंडळ भद्रावती, श्री मित्र गणेश मंडळ वरोरा, सर्वधर्म समभाव तसेच धार्मीक व सामाजिक संस्था वरोरा भद्रावती यांच्या माध्यमातून सदर कार्यक्रम घेण्यात आला.

सकाळी १० वाजता सदगुरु श्री संत गजानन महाराज, सदगुरु श्री संत साईबाबा, विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथा बाबा भांदेवाडा यांच्या पादुकाचे ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे यांच्या निवासस्थानी आगमन झाले.

तिथे पादुकांचे विधीवत पुजन करण्यात आले. दुपारी १:३० वाजता परम पुज्य भागवतमनिषी श्री मनिष महाराज यांचे ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे यांच्या निवासस्थानी आगमन झाले. सोबतच ७१ भजन मंडळीचे सुध्दा आगमण झाले. परम पुज्य भागवतमनिषी श्री मनिष महाराज यांच्या हस्ते पादुका पुजन व आरती करण्यात आली व जयघोषात भजन गायनाची सुरुवात करण्यात आली. दुपारी ३ वाजता भद्रावती नगरीत पादुका दिंडी काढण्यात आली. ७१ भजन संच व हजारो भाविक भक्तांसह वाजत गाजत पादुका दिंडी नगर परिक्रमा करीत सत्संग सोहळा गौरी ग्रीन लॉन श्री मंगल कार्यालय भद्रावती येथे सायं. ५ वाजता पोहचली. सायं ५:०० वाजता परम पुज्य भागवतमनिषी श्री मनिष महाराज यांचा स्वागत सत्कार करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे यांनी प्रस्ताविक मार्गदर्शन केले. परम पुज्य भागवतमनिषी श्री मनिष महाराज यांनी आपल्या सुमधुर वाणीव्दारा उपस्थिती भाविक भक्तांसमक्ष सुंदर असे प्रवचन सादर केले. भविक भक्त तल्लीन होवून मंत्रमुग्ध होवून नृत्यासह ईश्वरचरणी नतमस्तक होत रममान झाले.

मंचावर परिसरातील सदगुरु संताची उपस्थिती होती. वढा येथील सन्मा. गुरुवर्य संत श्री चैतन्य महाराज, हरणघाट येथील सन्मा. गुरुवर्य संत श्री मुर्लीधर महाराज, चंद्रपूर येथील सन्मा. गुरुवर्य संत श्री मधुबाबा महाराज, विदेही सदगुरु जगन्नाथ महाराज संस्थान भांदेवाडा येथील गुरुवर्य संत श्री बबनराव धानोरकर, गुरुवर्य संत श्री डाखरे महाराज, निरंकारी सत्संग मंडळ भद्रावतीचे किसनराव माटे तसेच जगन्नाथ महाराज मठ भद्रावतीचे केशव ताजणे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावरील संतांनी उपस्थित भाविक भक्तांना आध्यात्मीक मार्गदर्शन केले.

विविध क्षेत्रातील मौलीक योगदान असलेल्या मान्यवरांचे यावेळी स्मृतीचिन्ह, नारळ पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मान करण्यात आले. यात प्रामुख्याने गुरुदेव सेवा मंडळ मोझरी सर्वाधिकारी लक्ष्मणरावजी गमे, गुरुदेव सेवा मंडळ वरोरा रुपलालजी कावडे, निरंकारी सत्संग भद्रावती किसनराव माटे, गुरुदेव सेवा मंडळ भद्रावती विशाल गावंडे, किर्तनकार केशवानंद मेश्राम, धार्मिक सामाजिक कला क्षेत्रातील सुवर्णा पिंपळकार व प्रकाश पिंपळकर, आध्यात्मीक व सामाजिक क्षेत्रातील झनक चौधरी, बाळासाहेब पळवे, निस्वार्थ सेवा क्षेत्रात योगदान देत असलेले गवराळा अरुण पोपळी, कृषी क्षेत्रात योगदान स्नेहलता गिरडे, श्री संत झिंगुजी महाराज देवस्थान कमेटी भद्रावती नरेन्द्र पढाल, रुग्णसेवा क्षेत्रात योगदान रुग्णसेवक पंकज कातोरे, वेषभुषा रुपसज्जा क्षेत्र भैय्याजी मिरगे, संतोषी बँड पार्टीचे विजय मुंगरे, रुग्णसेवक गोसेवक ताडाळी येथील विनोद गोठी, भाऊरावजी खुटेमाटे, पुरातन वस्तु संग्रहकर्ता तसेच सामाजिक क्षेत्रात योगदानबद्दल अमित गुंडावार, कृषी करीता नरेश काळे व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच पादुका दिंडीत उपस्थित भजन मंडळींचे सन्मान सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रविकांत वरारकर यांनी तर आभार प्रदर्शन ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी पार पाडले. महाप्रसादाने श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व परम पुज्य भागवत सत्संग सोहळा मोठया हषोल्लासाने भक्तीभाव वातावरणात संपन्न झाला.