🔸वरिष्ठ अधिकारी निद्रावस्थेत.
✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर.(दि.7 मे) :-
गौण खजिनाची अवैध उत्खनन करून मालामाल होण्याची स्पर्धा सगळीकडे पाहायला मिळत आहे बांधकाम करण्यासाठी रेतीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याने यासाठी रेती कुठूनही रात्री तस्कर उत्खनन करत असतात वनपरिक्षेत्र कार्यालय खडसंगी (बफर )अंतर्गत येत असलेल्या ताडोबा बफर क्षेत्रातील निमढेला राखीव वनातील कक्ष नं.59 मध्ये येत असलेल्या कुबडघाट नाल्यातील रेतीची क्षेत्र सहाय्यक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या आशीर्वादाने रामदेगी देवस्थान मध्ये तसेच बाहेर रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवैध्य रित्या रेतीची वाहतूक सुरू आहे..
रामदेगी हे जिल्ह्यासह विदर्भात नावाजलेलं पर्यटन स्थळ याच ठिकाणी जाण्यासाठी महाराष्ट्रात गाजलेलं निमढेला सफारी गेट (बफर) आहे रामदेगीत विविध प्रकारच्या वन्य प्राण्यांच्या वावर असून वाघ, बिबट, अस्वल रानगवा, चितळ, नीलगाय मोर, अनेक प्राणी तसेच पक्षी या ठिकाणी पर्यटकांना दर्शन देत असतात.
रामदेगी निमढेला गेट परिसरात भानुसखिंडी व तिचे बछडे,हजारे, हनवते,शिवा, नयनतारा यांचा अधिवास असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात नेहमीच गर्दी पाहायला मिळत असून हिवाळात, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा गेट सर्वात पर्यटकांसाठी हाउसफुल चालत आहे, बछड्यांच्या अधीवास असलेल्या कुबडघाट नाल्यातील रेती रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टरच्या सहाय्याने क्षेत्र सहाय्यक यांच्या आशीर्वादाने वाहतूक सुरू आहे निमढेला या गेटमधून रामदेगी येथे भाविकांना जाण्यासाठी सायंकाळी पाच नंतर बंदी असते परंतु रात्रीच्या कर्कस आवाजात अवैद्य रेती घेऊन चालणारे ट्रॅक्टर यांना मात्र खुलेआम जाण्यास मार्ग मोकळा आहे सायंकाळी चालणाऱ्या कर्कश ट्रॅक्टरच्या आवाजात वन्य प्राण्यांसहित पशुपक्ष्यांची झोप उडवत आहे, याला जबाबदार कोण ?
काही महिन्यापूर्वी राज्याचे सचिव तसेच राज्याचे माजी सचिव प्रवीण परदेशी,अनेक मंत्रालयातील मोठे अधिकारी वर्ग या परिसरात भानुसखिंडीच्या बछड्यांनी केलेल्या मोठ्या रानगवा शिकारीचे कुतूहल पाहण्यासाठी भेटी दिल्या आहेत, परंतु आता नाल्यातील अवैध्य रेती चोरीमुळे वाघांचे असलेल्या अधिवास नष्ट करण्यात आला .
त्यामुळे हे वाघ परिसरातील शेतशिवार,गावाभोवती नागरिकांना पाहायला मिळत असल्याने मानव वन्यजीव संघर्ष वाढण्याची संभावना बडावली आहे त्यामुळे वनविभागातील वरिष्ठ अधिकारी यांची चौकशी करून दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का ? असा प्रश्न परिसरात नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे.