🔸कॉलेज आणि संस्थेची त्वरित योग्य ती चौकशी करून कवीश्वर / कुळकर्णीच्या सर्वं पदांची मान्यता तात्काळ रद्द करून घेतलेले सर्व आर्थिक लाभ परत घ्यावे – डॉ. राजेश नाईक
✒️यवतमाळ.(Yavatmal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
यवतमाळ(दि.6 मे) :- बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, शिवाजी नगर, यवतमाळ, महाराष्ट्र – 445 001, येथिल संगीत विषयाच्या प्राध्यापिका आणि महाविद्यालयाच्या कार्यकारी प्प्राचार्या कु. वर्षा मनोहर कवीश्वर / डॉ. सौ. वर्षा धनंजय कुळकर्णी या दिनांक 01/08/1988 रोजी उपरोक्त महाविद्यालयामध्ये संगीत विषयाच्या अधिव्याख्याता पदावर रुजू झाल्या व त्यामधिल नियमानुसार उपरोक्त महाविद्यालयाच्या नियुक्ती आदेशाप्रमाणे आणि विद्यापीठाच्या मान्यता पत्रातील अटी तसेच तरतुदीनुसार नियुक्ती दिनांकापासून 06 महिन्यांच्या आत “ जात वैधता प्रमाणपत्र “ सादर करणे कायद्याने बंधनकारक होते, त्याचप्रमाणे 08 वर्ष्याच्या कालखंडात प्रा. कवीश्वर / कुळकर्णी यांनी M. Phil. / Ph. D पदवी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आणि बंधनकारक होते परंतु, कवीश्वर / कुळकर्णी यांनी उपरोक्त दोन्ही अटी पूर्ण न केल्याने महाविद्यालयाने त्यांची सेवासमाप्त करणे आवश्यक आणि कायद्याने बंधनकारक होते.
मात्र महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन आणि संस्थेशी संघनमत करून नियमबाह्यपद्धतीने संपूर्ण नियम व कायदे धाब्यावर बसवून त्या अद्यापही आपल्या पदावर कार्यरत असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास येत आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. इतकेच नव्हे तर उपरोक्त महाविद्यालयाच्या संस्थेने व विद्यापीठाने कवीश्वर / कुळकर्णी यांच्याकडे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र आणि पुरेशी शैक्षणिक पात्रता नसतांनादेखिल त्यांना वेळोवेळी पदोन्नती देऊन इतकेच नव्हे तर त्यांना प्राचार्य पदी विराजमान करून त्यांना मोट्ठे बक्षीसही दिलेले आहे तसेच मा. सहसंचालक, कार्यालयाचेही त्यांना पाठबळ असल्याचे दिसून येते. कारण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावतीने कवीश्वर / कुळकर्णीचे जात प्रमाणपत्र अवैध आणि जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेला दावा अवैध ठरवल्यानंतरही उपरोक्त व्यक्ती अद्यापही आपल्या पदावर कार्यरत आहे, ही संस्था, विद्यापीठ आणि शासनासाठी अत्यंत लाजिरवाणी अशा स्वरूपाची गोष्ट आहे.
शैक्षणिक सत्र 1988 – 1989 मध्ये दिनांक 01/08/1988 रोजी कु. वर्षा मनोहर कवीश्वर / डॉ. सौ. वर्षा धनंजय कुळकर्णी यांची नियुक्ती ही महाविद्यालयाच्या व संस्थेच्या बिंदू नामावलीनुसार (Roster) भटक्या जमातीमधिल (N. T. B.) मध्ये झालेली होती त्यामुळे 06 महिन्यांच्या आत उपरोक्त महाविद्यालयाने त्यांना जात वैधता प्रमाणपत्र घेणे कायद्याने बंधनकारक होते.
परंतु, तब्बल 25 वर्षांनंतर दिनांक 22/10/2013 रोजी महाविद्यालयाने कवीश्वर / कुळकर्णीला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावती यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्त्राकरिता प्रस्ताव सादर करावयास सांगितले, त्यानुसार मा. संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव महोदय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावती, यांनी उपरोक्त महाविद्यालयाच्या मा. प्राचार्य महोदयांना पाठविलेल्या दिनांक दिनांक 02/03/2017 रोजीच्या पत्रामध्ये कु. वर्षा मनोहर कवीश्वर / डॉ. सौ. वर्षा धनंजय कुळकर्णी यांची उपरोक्त नियुक्ती ही महाविद्यालयाच्या बिंदू नामावलीनुसार खुल्या प्रवर्गामधून (Open Category) झालेली असल्यामुळे त्यांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे म्हटले आहे. जर कवीश्वर / कुळकर्णीची नियुक्ती खुल्या प्रवर्गामधून ( Open Category) झाली असती तर समितीकडे प्रस्ताव पाठवण्याची काय आवश्यकता होती ???
त्यामुळे जर उपरोक्त पद हे कवीश्वर / कुळकर्णी यांच्या नियुक्तीच्या वेळी महाविद्यालयाच्या आणि संस्थेच्या बिंदू नामावलीनुसार (Roster) मागासवर्गीय उमेदवारासाठी राखीव असलेल्या भटक्या जमातीमधिल (N. T. B.) या प्रवर्गासाठी राखीव होते तर दिनांक 22/10/2013 रोजी उपरोक्त प्राध्यापिका कु. वर्षा मनोहर कवीश्वर /डॉ. सौ. वर्षा धनंजय कुळकर्णी यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केलेल्या बिंदू नामावलीनुसार त्यांची नियुक्ती खुल्या प्रवर्गात कशी काय दाखविण्यात आली ??? असा प्रश्न दिनांक 09/08/2017 रोजी विद्यापीठाच्या मागासवर्ग कक्षातील मा. उपकुलसचिवांनी उपरोक्त महाविद्यालयाच्या मा. प्राचार्यांना विचारलेला असून उपरोक्त दोन्हीही विसंगत बाबींची शहानिशा महाविद्यालयाला आपल्या स्तरावर करायला सांगितलेले आहे. त्यानुसार दिनांक 17/10/2018 रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावतीचे मा. उपायुक्त आणि सदस्य महोदयांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावतीच्या मा. संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांचे उपरोक्त दिनांक 02/03/2017 रोजीचे पत्र रद्द करून जात वैधता प्रमाणपत्राकरिता कवीश्वर / कुळकर्णीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिले. त्यानुसार पुन्हा कवीश्वर / कुळकर्णीने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावती, यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्राकरिता दावा सादर केला की, जो समितीने रद्द केला.
इतकेच नव्हे तर समितीने कवीश्वर / कुळकर्णी यांना कार्यकारी दंडाधिकारी, अचलपूर, जिल्हा अमरावती यांनी निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र क्रं. RC No. CH. Bz / 3362 / MRC – 81/ Belorn / 2013 – 14, दिनांक : 23/09/2013 हे जातीचे मूळ प्रमाणपत्र जप्त करून रद्द केलेले आहे. याचा अर्थ असा होतो की, नियुक्तीच्या वेळी कवीश्वर / कुळकर्णीकडे जातीचे प्रमाणपत्रही नसतांना महाविद्यालयाने त्यांची नियुक्ती मागासवर्गीय उमेदवाराकरिता राखीव असलेल्या भटक्या जमाती ( N. T. B.) मधून केली. आता आपल्याला आपल्या भविष्य निर्वाह निधी (GPF) मधून आर्थिक लाभ घेता येणार नाही. या भितीपोटी कवीश्वर / कुळकर्णी यांनी आनंद आणि अमेय या त्यांच्या मुलांच्या नावाने खोट्या लग्नपत्रिका जोडून GPF मधून सुमारे 25 ते 30 लक्ष रुपये उचललेले आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यांच्या एकाही मुलाचे लग्न अद्यापही झालेले नाही, हे विशेष.
त्जर संस्था कु. वर्षा मनोहर कवीश्वर / डॉ. सौ. वर्षा धनंजय कुळकर्णी यांच्याकडे जात प्रमाणपत्र नसतांनाही त्यांची राखीव जागेवर नियुक्ती करते, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र जप्त करून रद्द केले, जात वैधता प्रमाणपत्राकरिता केलेला अवैध ठरविल्यानंतरही उपरोक्त व्यक्तीला नोकरीत कायम ठेवते, पदोन्नती देते प्राचार्य पदाचे बक्षीस देते सेवानिवृत्तीचा प्रस्ताव मंजुरीकरिता मा. सहसंचालक कार्यालयाकडे पाठवित आहे. याचाच अर्थ असा आहे की, संस्थेकडे दोन बिंदू नामावल्या अस्तित्वात आहेत व त्यांचा वापर उपरोक्त संस्था ही, आपल्या सोईनुसार करित आहे.
त्यामुळेच उपरोक्त संस्था कु. वर्षा मनोहर कवीश्वर / डॉ. सौ. वर्षा धनंजय कुळकर्णी यांच्या विरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्याऐवजी त्यांच्या सेवानिवृत्तीपुर्वी त्यांना प्राचार्य पदाचे बक्षीस देत असेल तर नक्कीच उपरोक्त समस्त प्रकारामध्ये मोठ्ठ गौडबंगाल किंबहुना मोठ्ठा घोटाळाच आहे. त्यामुळे उपरोक्त प्रकाराची चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातल्यात्यातच याठिकाणी एक विशेष उल्लेखनीय बाब अशी आहे की, कवीश्वर / कुळकर्णी या 01/08/1988 ला उपरोक्त महाविद्यालयात भटक्या जमातीतील ( N. T. B.) याकरिता राखीव असलेल्या पदावर रुजू होऊनही त्यांच्याकडून उपरोक्त संस्थेने सुमारे 25 वर्ष्याँपर्यंत कोणत्याही जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्राशिवाय तसेच नियुक्तीनंतर 08 वर्ष्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी M. Phil. / Ph. D. ची पदवी प्राप्त करणे अत्यंत क्रमप्राप्त असूनही त्याकडे दुर्लक्ष करून उपरोक्त संस्थेने त्यांची अगदी हेतू पुरस्परपणे कवीश्वर / कुळकर्णी यांची सेवा सुरूच ठेऊन त्यांची पाठराखण केली.
त्यामुळे कु. वर्षा मनोहर कवीश्वर / डॉ. सौ. वर्षा धनंजय कुळकर्णी आणि महाविद्यालय व संस्थेची सखोल चौकशी करून कवीश्वर / कुळकर्णी यांच्या सर्वं पदांची मान्यता ताबडतोब रद्द करून त्यांनी शासनाकडून मिळविलेले सर्वं आर्थिक लाभ परत घेण्यात यावे, अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेश नाईक यांनी केलेली आहे.